साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे विचार घरोघरी पोहचवा :- बहुजन क्रांती मोर्चा.
By -
August 03, 2023
0
नेर :- हि न्याय व्यवस्था काहिकांची रखेल झाली, हि संसद देखील हिजड्यांची हवेली झाली, मी माझ्या व्येथा मांडू कोणाकडे कारण इथली न्याय व्यवस्था भ्रष्टतेने रंगिन झाली. अशी आपल्या लेखणीतून रोखठोक भुमिका मांडणारे व या व्यवस्थेची सत्यता जगा समोर ठेवणारे साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त बहुजन क्रांती मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा, लहुजी क्रांती मोर्चा, मौर्य क्रांती संघ,राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय आदिवासी एकता परिषद, व समाज सेवक संघटना या विविध संघटनांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले व अण्णाभाऊ साठे यांच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला, यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी मौर्य क्रांती संघाचे तालुका अध्यक्ष मा. अनिरुद्ध मुंदाने हे होत, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य हे सरकारने प्रकाशित करून समाजा पर्यंत पोहचवावें, परंतु बहुजन महापुरुषांचे साहित्य प्रकाशित करायला का कुचकामी ठरते असे प्रतिपादन मा. प्रा.मनोहरराव देशमुख यांनी केले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद पाटील यांनी केले तर प्रस्ताविक राजीव डफाडे यांनी केले, व आभार प्रदर्शन रजा शेख यांनी केले यावेळी वासुदेवराव शेंडे, प्रमोद गायकवाड, बासित खान,डॉ. अशोक खोब्रागडे, प्रा.निलेश मोखाडे सर, जियाउल्ल्हा खान, सतीश इळपाते, भूषण गायकवाड तसेच सहयोगी संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
Tags: