नेरपरसोपंत विदर्भ प्रतिनिधी रजा शेख : राजश्री शाहू महाराजांनी सर्वधर्म समभावाची ज्योत प्रज्वलित करून समस्त बहुजन समाजाला मानवतेचा संदेश दिला, राष्ट्र उभारणीसाठी महाराजांनी दिलेले योगदान आम्हा सर्व भारतीयांसाठी अभिमानास्पद आहे, त्यांच्या कल्याणकारी कार्याचा परिचय येणाऱ्या पिढ्यांना व्हावा या उदात्त हेतूने आम्ही राजश्री शाहू महाराज आरक्षण दिन विशेषांक प्रकाशित करीत असल्याचे प्रतिपादन बळीराजा स्वराज्य सेना या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, सामाजिक अभियंते नरेंद्र गद्रे यांनी यावेळी केले.
दिनांक 26 जुलै रोजी आरक्षण दिनानिमित्त राजश्री शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल येथे आयोजित कार्यक्रमात ते अध्यक्ष स्थानावरून बोलत होते, पुढे बोलताना ते म्हणालेत बळीराजाला मानवतावादी विचार आणि संघटित करणे सामर्थ्यवान बनविणे त्यांच्यामध्ये परिपक्व नेतृत्व तयार करणे व बळीराजाला आर्थिक समृद्ध करणे बळीराजाची प्रगती हीच देशाची प्रगती हाच दृष्टिकोन कोल्हापूर संस्थांमध्ये राजश्री शाहू महाराज यांचा होता अन्नदाता सुखी भव हेच आमच्या संघटनेचे मिशन असून राजश्री शाहू महाराजांचा शिक्षण संघटन व सामर्थ्याचा विचार व इतर महापुरुषांचे मानवतावादी विचार यांचा प्रसार व प्रचार करण्यासाठीच बळीराजा जनकल्याण केंद्राची (एनजीओ) ची स्थापना करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले यावेळी मंचावर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते रयतेचे मुखपत्र बळी संदर्भ मासिकाचा राजश्री शाहू महाराज आरक्षण दिन विशेष अंकाचे थाटात प्रकाशन करण्यात आले.
महासम्राट बळीराजा व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या काळामध्ये कधीच शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या नाही. त्यांचा काळ हा शेतकऱ्यांसाठी सुजलाम सुफलाम होता. खऱ्या अर्थाने जनतेचे राज्य होतं, म्हणूनच आजचा आधुनिक बळीराजा म्हणजेच राजर्षी शाहू महाराज होय असे गौरवोद्गार बाळासाहेब गावंडे ज्येष्ठ विचारवंत यांनी गौरवोद्गार काढले,
याप्रसंगी राजर्षी शाहू इंग्लिश मीडियम स्कूल मधील स्कॉलरशिप मध्ये पास झालेल्या विद्यार्थ्यांचे मान्यवराच्या हस्ते सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे उद्घाटन शेतीतज्ञ बाबासाहेब कपिले यांच्या हस्ते पार पडले, निसर्गोपचार तज्ञ मधुकर सोनटक्के, युवा उद्योजक रियाज टिक्की, मराठा सेवा संघाचे अध्यक्ष मनोहर देशमुख , माजी नगरसेविका एड अड् रश्मी पेटकर , सामाजिक कार्यकर्त्या प्रमोदिनी मुंदाने अध्यक्ष मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र तसेच राजश्री शाहू इंग्लिश मीडियम स्कूलच्या मुख्याध्यापिका श्वेता गद्रे मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन सहाय्यक शिक्षिका वर्षाताई तुपटकर , प्रास्ताविक प्रमोद दरोई तर आभार प्रदर्शन निवासी संपादक "बळी संदर्भ" राजेश धोटे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रजा शेख, मोहन पापळकर, प्रशांत भेंडे ,प्रफुल नेरकर, विनोद कापसे, भीमदास वरठी, किशोर आरसोड व राजश्री शाहू महाराज इंग्लिश मीडियम स्कूल च्या सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले.