गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळ्यात मान्यवरांचे मार्गदर्शन
नेरपरसोपंत विदर्भ प्रतिनिधी रजा शेख " आजच्या विद्यार्थ्यांने केवळ रूढ मार्गाने न जाता वर्तमानकालीन स्पर्धा आणि संधीचे भान डोक्यात ठेवून वाटचाल करावी आणि महत्वाचे म्हणजे गुणवंतांनी यशाचे शिखर चढताना महामानवांच्या विचारांचा प्रेरणादीप सतत जागृत ठेवावा " असा मौलिक उपदेश मेत्ता भिशी संघाच्या वतीने आयोजित सत्कार समारंभात मान्यवर पाहुण्यांनी दहावी बारावीतील गुणवंत विद्यार्थ्यांच्या सत्कार प्रसंगी केला.
फुले शाहू बाबासाहेब यांचा विचार वारसा जोपासणाऱ्या शिक्षितांनी मेत्ता म्हणजे मैत्री जोपासून आर्थिक सामाजिक परिवर्तनासाठी कटिबध्द असलेल्या मेत्ता भिशी संघाच्या वतीने हा सत्कार समारंभ आयोजित केला होता.इंजिनिअर संजय मानकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या
सत्कार समारंभात प्रमुख मार्गदर्शक म्हणून डॉ. शांतरक्षित गावंडे, डॉ.चंद्रकांत सरदार , डॉ.आलोक कुशवाह लाभले होते.
यावेळी मंचावर अशोक वानखेडे, सिद्धार्थ भवरे, डॉ.ओंकार, माजी मुख्याध्यापक पाटील सर विजय रंगारी सर उपस्थित होते.
यावेळी बारावीच्या अनन्या जयसिंग चव्हाण, दिव्यजा दिपक सोनोने, अभिज्ञा पाटील, सुहानी अर्जुने, रोशनी भगत या विद्यार्थ्यांचा तर दहावीच्या हर्ष खरे, गौरव डोंगरे, मयुरी मेश्राम, संस्कार राऊत, आस्था पाटील, नेत्राणी लोखंडे, यश वासनिक, पुष्कर चव्हाण, प्रांजली इंगोले, मंजुश्री भवरे, समर खोब्रागडे, श्रेयस चांदवे, गौतमी घडले पूर्णिमा जवादे, मानस ,राहुल मेश्राम, स्मित गायकवाड, संघर्ष मेश्राम, या विद्यार्थ्यांचा सन्मानचिन्ह प्रमाणपत्र देऊन पाहुण्यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच भिशी संघाचे सभासद विजय रंगारी यांची प्राचार्य पदी पदोन्नती झाले त्यामुळे त्यांचा सत्कार करण्यात आला
कार्यक्रमाचे अध्यक्ष इंजि. मानकर यांनी "पालकांनी आपले पाल्यास त्यांचे मनानुसार क्षेत्र निवडीचे स्वातंत्र्य द्यावे आणि सहकार्य करावे " असे आवाहन केले. कार्यक्रमास विद्यार्थी आणि त्यांचे पालक आणि भिशी संघाचे सभासद उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संचालन आयु कवडू नगराळे आणि सिद्धार्थ मानकर यांनी केले तर प्रास्ताविक मधुकर भैसारे यानी केले आणि इंजि दीपक नगराळे यांनी आभार मानले .
कार्यक्रमास भिशी संघाच्या मान्यवरांसह संजय मानकर ,राहुल भरणे, घनश्याम भारशंकर, घनश्याम नगराळे, देवीदास उबाळे, विलास वानखेडे, रवींद्र मेश्राम , अनिल डोंगरे, कविता डोंगरे, भिमराव गायकवाड, रुद्रकुमार रामटेके यानी सहकार्य केले . इन्जी दीपक नगराळे, मधुकर भैसारे सिद्धार्थ मानकर रवि चव्हाण आणि धीरज वाणी यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी मेहनत घेतली