नेर :- विदर्भ प्रतिनिधि रजा शेख - नबाबपूर येथे समाज सेवक समूह व बहुजन क्रांती मोर्चा, सामाजिक कार्यकर्ता ग्रुप व सहयोगी संघटनेच्या वतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त वृक्ष रोपणाचा कार्यक्रम संपन्न झाला, आजच्या काळात खूप मोठ्या प्रमाणात जंगलतोड वृक्षतोड होत असून याला वाचवण्याचं काम झालं पाहिजे व प्रत्येकाने एक तरी झाड लावून त्याचे संगोपन केले पाहिजे असे मत साजित खान यांनी व्यक्त केले, तसेच मनुष्याचे जीवन वृक्षां पासून मिळणाऱ्या ऑक्सीजन वर अवलंबून असून झाडे वाचवल्याशिवाय पर्यावरण समतोल राखल्या जाणार नाही त्याकरिता झाडे लावा व झाडे जगवा ही संकल्पना सर्वांनी राबवली पाहिजे असे मत बहुजन क्रांती मोर्चा चे तालुका संयोजक सुनील गवई यांनी व्यक्त केले, सदर कार्यक्रम नवाबपुरा येथे संपन्न झाला असून विविध ठिकाणी झाडाची लागवड करण्यात आली या वृक्षारोपण कार्यक्रमाला साजिद खान , रजा शेख, शोहेब खान अबरार खान, अनिरुद्ध मुंदाने, अरविंद पाटील, सय्यद इर्शाद, टिपू दिवाणजी, दानिश दिवाणजी, अलताफ टेलर, जावेद खान, फिरदोष खान, मोहम्मद सगीर, जुनेद अली, सय्यद फैजाज इत्यादी उपस्थित होते
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त नेर येथे समाज सेवक समूह चा वतीने वृक्ष लागवड.
By -
June 05, 2023
0
Tags: