नेरपरसोपंत विदर्भ प्रतिनिधी रजा शेख:-माजी पर्यावरण मंत्री तथा युवा सेना प्रमुख आदित्य उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त स्थानिक नेर येथील ग्रामीण रुग्णालयात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गट व युवा सेनेच्या वतीने गरजू रुग्णांना फळ व बिस्किटाचे वाटप करण्यात आले.
यावेळी शिवसेना नेर तालुकाप्रमुख नितीन माकोडे, शहर प्रमुख खुशाल मिसाळ, बंडूभाऊ देशमुख, उपजिल्हाप्रमुख रवीपाल गंधे, अनिल चव्हाण, गजानन दहेलकर, प्रमोद राणे, युवा सेना जिल्हाप्रमुख संकेत ठाकरे, चंद्रकांत तनमणे, प्रशांत गावंडे, बाबाराव राठोड, सुधाकर सरोदे, सुभाष खरडकर, आशा मिसळे, वंदना उके, अर्जुन राठोड, अंकुश गावंडे, प्रणय बोबडे, गणेश ठाकरे, अंकुश नारिंगे, गजानन बांते, सतीश बांते, सुनील राठोड, अनिल महाजन, महेश चावके, जय राठोड, विनोद रंगारी, आदी शिवसैनिकांची प्रामुख्याने उपस्थिती होती.