वणी विदर्भ प्रतिनिधी रजा शेख:---
निळापुर ब्राम्हणी रोडवरील वैभव कोटेक्स जिनिंगच्या शेडमध्ये ठेवण्यात आलेल्या कापसाच्या गंजीला आग लागून लाखो रुपयाचे नुकसान झाल्याची घटना आज दिनांक १४ जून रोजी स दुपारी १२ वाजेच्या दरम्यान घडली.
आग लागली असता जिनिंग मधिल कर्मचाऱ्यांनी पाण्याचा मारा सुरु केला.लगेचच वणी येथील अग्निशामनदल पोहचुन आगीवर नियंत्रण मिळविले.नेमके किती रूपयांचे नुकसान झाले आहे हे कळू शकले नाही.तसेच
आग कशामुळे लागली हे कळू शकले नाही.