पांढरकवडा विदर्भ प्रतिनिधी रजा शेख:- नेफडो मिशन एज्युकेशन व बायो-सायन्स एकेडमीद्वारा आयोजित करण्यात आलेल्या कलावेध धम्माल उन्हाळी शिबिराचा समारोप व गुणगौरव सोहळा नुकताच संपन्न झाला.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मयूर सूरवसे वनपरिक्षेत्र अधिकारी वनविभाग, मार्गदर्शक प्रा.लीलाताई भेले संचालिका फुले आंबेडकर महिला प्रबोधिनी संस्था, प्रमुख पाहुणे अनिल बोरले माजी उपाध्यक्ष नगरपरिषद उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली.त्यानंतर नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या सदस्या आशादेवी कुळसंगे, रत्ना वेदपाठक,राधा जोशी,कोमल जोशी,रमा तोटावार,रोशनी बोरले यांच्या हस्ते मान्यवरांचा शाल,श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.याप्रसंगी त्र्यंबक तोटावार सेवानिवृत्त पोलीस उपअधीक्षक यांच्याद्वारे विविध जादूचे प्रयोग दाखवून वैज्ञानिक दृष्टीकोन निर्मिती यावर प्रकाश टाकण्यात आला.
विद्यार्थ्यांच्या सुप्त कलागुणांना वाव मिळावा विद्यार्थी ज्ञानसंपन्न,चौकस बुद्धीचा व अनुभवकुशल व्हावा या दृष्टीने विद्यार्थ्यांकरीता अभ्यासपूरक ,जीवनोपयोगी उपयुक्त कार्यशाळांचे आयोजन उन्हाळी शिबिरात करण्यात आले यासंबंधी सविस्तर माहिती बायो-सायन्स एकेडमी संचालिका व नैसर्गिक पर्यावरण संवर्धन व मानवता विकास संस्थेच्या महाराष्ट्र राज्य महिला अध्यक्षा डॉ.प्रिती तोटावार यांनी दिली.या कार्यशाळांमध्ये भाषाविकास, इंग्लिश ग्रामर,अंधश्रद्धा निर्मूलन,मातीकाम, हस्तकला,बांबूक्राफ्ट,आरोग्य शिबिर, गायन,नृत्य वक्तृत्व,योग प्रशिक्षण, चित्रकला,आर्ट अँड क्राफ्ट,क्रिडा शिक्षण, एक मिनिट शो,हस्ताक्षर कार्यशाळा, सीडबॉल कार्यशाळा,प्रश्नमंजूषा, वन्यजीव संवर्धन,जलपूरवठा क्षेत्रभेट इत्यादी विविध कार्यशाळांकरीता सुनीता रोगे,रेणुका सोनी, ललिता पत्रीवार, सुधाकर मामीडवार,त्र्यंबक तोटावार, प्रा.लीलाताई भेले,राम संकुरवार,डॉ. दीपक नैताम,हर्षल पवार,सुभाष भोयर,संतोष डोंगरे, विनोद जाधव,सुवर्णा परचाके,डॉ.प्रिती तोटावार यांचे मार्गदर्शन लाभले.याप्रसंगी बायोसायन्स एकेडमी मधील गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र व एकेडमीक एक्सलंस अवार्ड देऊन सत्कार करण्यात आला व उन्हाळी शिबिरातील सर्व सहभागी विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले.नेफडो मिशन एज्युकेशन अंतर्गत बायो सायन्स एकेडमीमध्ये राबविण्यात आलेल्या वैविध्यपूर्ण शैक्षणिक कार्याचे मान्यवरांनी कौतुक करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.