पांढरकवडा विदर्भ प्रतिनिधी रजा शेख:-गेल्या महिन्याभरापासून मान्सूनच्या पावसाची वाट पाहत असलेल्या शेतकऱ्यांना अखेर जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्याची वाट पहावी लागली.मृग नक्षत्र संपूर्ण कोरडे गेले मात्र आता मान्सूनच्या पावसाने चांगला जोर पकडल्याचे चित्र तालुक्यात दिसत आहे.दि.२५ जूनच्या सायंकाळपासून पावसाला सुरुवात झाली तर रात्री जोरदार पाऊस तालुक्यात कोसळला असून तालुक्यात ढगाळी वातावरण तयार झालेले आहे.मान्सूनचा पाऊस चांगला कोसळल्यास जमिनीमध्ये ओलावा निर्माण झाल्यास बळीराजा पेरणीच्या कामाला वेग देत आहे.शेत शिवारात शेतकरी कुटुंबासह राबताना दिसत असून कापूस,सोयाबीन,तुर,मुंग, उडीद,तीळ असे इत्यादी पिकांची पेरणी करण्याच्या तयारीत दिसत आहेत. तालुक्यात गेल्या महिन्याभरापासून प्रखर उन्हाचा तडाखा जाणवत होता.शेवटच्या मे आणि जून मध्ये तालुक्यात वाढत्या तापमानाचा उच्चांक गाठल्याचे चित्रही निर्माण झाले होते.या तापमानाने संपूर्ण तालुक्यातील जनजीवन विस्कळीत होऊन व्यवसायिक,शेतकरी,शेतमजूर सर्वांवरच या याचा परिणाम जाणवला होता.तर अर्थकारणही सर्वांचेच बिघडले होते.गेल्या दोन-तीन दिवसापासून ढगाळी वातावरण व पावसाने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आनंद असून कृषी केंद्रामध्ये मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची गर्दी उसळलेली आहे. याकडे कृषी विभागाच्या भरारी पथकांनी तालुका कृषी अधिकाऱ्यांच्या पथकांनी पंचायत समितीच्या कृषी अधिकाऱ्यांनी कृषी केंद्रावर बारीक लक्ष ठेवणे अत्यंत गरजेचे आहे.
केळापूर तालुक्यात पावसाची हजेरी
By -
June 27, 2023
0

Tags: