विदर्भ प्रतिनिधि रजा शेख
पांढरकवडा:- २ जुन रोजी १० वि चा ऑनलाईन पध्दतीने निकाल जाहिर करण्यात आला आहे.यामध्ये स्थानिक जिल्हा परिषद हायस्कुलची विद्यार्थीनी कु माहेश्वरी ओमेश दर्शनवार हिने घवघवीत यश संपादन केले आहे.तिला ९२.८० टक्के गुण मिळाले आहे.कु माहेश्वरी ला मराठीमध्ये ९०,स्टोर ऑपरेशन असिसटन्ट ९०,इंग्रजी ९२,मॅथेमॅटिक ९२,सायन्स अॅन्ड टेक्नॉलाजी ९१,सोशल सायन्स ९४ अशा प्रमाणे गुण मिळाले आहे.माहेश्वरी ला ५०० पैकी बेस्ट ऑफ ५ चे ४५९ गुण तथा ५ गुण स्पोटर्सचे मिळाले आहे.कु माहेश्वरी हि केळापुर तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष ओमेश दर्शनवार यांची मुलगी असुन तिच्या या घवघवीत यशाबद्दल तिचे सर्वत्र स्तरावरुन कौतुक करण्यात येत आहे. माहेश्वरीने आपल्या यशाचे श्रेय आई-वडील व शिक्षकांना दिले आहे