पांढरकवडा/ विदर्भ प्रतिनिधी रजा शेख:-केळापूर तालुक्यातील पाटणबोरी येथील आदिवासी समाज बांधवांतर्फे आदिवासी समाज बांधवांचे सण उत्सव व अन्य सार्वजनिक कार्यक्रम राबविण्यासाठी येथील पोलीस स्टेशन व फॉरेस्ट क्वॉर्टरच्या मधात असलेली खुली जागा ग्रामपंचायतिने ठराव घेऊन एक आरक्षित केली होती पण घेतलेल्या ठरावा नुसार त्याची अंमलबजावणी केली नाही, त्यामुळे त्या आरक्षित खुल्या जागेवर व्यावसायिकांनी अतिक्रमण केले त्यामुळे ती जागा व्याप्त असल्याने आदीवासी समाज बांधवांना त्या जागेचा वापर करता येत नसल्याने त्या जागेवरील अतिक्रमण हटवून सदरची जागा ही समाज वापरासाठी खुली करून देण्यात यावी या मागणीला घेऊन येथील ग्रामपंचायत कार्यालया समोर दिनांक २१ जून पासून आदिवासी समाज बांधवांनी आमरण उपोषण सुरू होते उपोषणाचा दुस-या दिवसी ग्रामपंचायत प्रशासन आणि उपोषणकर्ते यांच्यात सांगोपांग चर्चा होऊन त्याजागेवरील अतिक्रमण आठ दिवसात हटविण्यात येईल असे लेखी आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनाने लिहून दिल्या नंतर हे उपोषण तूर्त स्थगित करण्यात आले पण लेखी दिलेल्या आश्वासनाची अंमलबजावणी न झाल्यास हे उपोषण याच ठिकाणी पुन्हा करण्यात येईल अशी माहिती आदिवासी नेते बंडू सोयाम अंकित नैताम यांनी दिली.
या मागणीला घेऊन पाटणबोरी येथील आदिवासी समाज बांधवांच्या वतीने सुभाष चांदेकर,अक्षय सिडाम,विनोद कनाके यांनी आमरण उपोषण सुरू केले होते उपोषणाचा दुसरा दिवस चालू असताना उपोषण मंडपाला ग्रामपंचायत सचिव सरपंच ग्रा,प सदस्य उपोषण मंडपाला भेट देऊन या विषयावर चर्चा केली असता असलेल्या अतिक्रमणचा तोडगा न निघत असतांना पाहून,सरपंच, ग्रामसेवक समस्त ग्रा.पंचायत सदस्य यांनी पांढरकवडा येथे गटविकास अधिकारी तहसीलदार केळापूर यांची भेट घेऊन चर्चा करून झालेले तसेच मुंबई ग्रामपंचायत अधिनियम १९५८ कलम ५३ नुसार अतिक्रमणधारकास नोटीस बजावून शासकीय नियमानुसार आठ दिवसात अतिक्रमण हटविण्यात येईल, त्यासंबंधी सर्व विभागाला पत्रव्यवहार झाला आहे.करीता हे लेखी आश्वासन ग्रामपंचायत प्रशासनतर्फे देण्यात येत आहे,तेव्हा आपण अवलंबलेला उपोषणाचा मार्ग सोडावा ही विनंती उपोषणाच्या दुसऱ्या दिवशी उशिरा रात्री नऊ वाजता करण्यात आली होती आदिवासी समाज संघटनेने स्वीकारत उपोषण कर्त्यांच्या हातून ग्राम पंचायत सरपंच सचिव यांच्या कडून लेखी आश्वासन पत्र घेऊन उपोषण स्थगित करण्यात आले उपोषण सोडता वेळी आदिवासी नेते बंडू सोयाम,माजी नगरसेवक अंकित नैताम,अतुल कनाके अध्यक्ष,दयाकर सिडाम,कपिल दरवळे,शंकर नक्कलवार,अमोल कनाके,गजुभाऊ शिंगेवार,साई मेश्राम,बजरंग सिडाम मारोती सिडाम समस्त आदिवासी समाज बांधव उपस्थित होते .