पांढरकवडा विदर्भ प्रतिनिधी रजा शेख :-जूनच्या तिसऱ्या आठवड्यातही प्रखर उन्हाच्या प्रकोपामुळे व गरम हवेच्या झळांमुळे 'मेहिटचा' अनुभव येत आहे. -७ जूनला मृग नक्षत्र लागले असूनही आभाळामध्ये कुठेच डगांचे आच्छादन दिसत नसल्याने बळीराजाची चिंता वाढली आहे.केळापूर तालुक्यातील पहापळ परीसरात काही प्रमाणात सिंचनाची सोय असल्याने शेतकन्यांनी कपाशी,सोयाबीनची लागवड जुनच्या पहिल्याच आठवड्यात केली आहे.पण उष्ण तापमानामुळे निघालेले अंकुरही कोमजत असल्याने बळीराजा पावसाची वाट बघत आहे.एरव्ही दरवर्षीच मे च्या शेवटी अथवा जूनच्या सुरुवातीला काही प्रम गणात का होईना पाऊस पडती.मात्र बंदा एप्रिलमध्ये अवकाळी पाऊस,गारपीट वादळी वाऱ्याने आर्णी तालुक्याला झोडपून काढले होते.मात्र यंदा जून महिन्याचा दुसरा आठवडा संपला तरीही प्रखर उन्हाचा तडाखा जाणवत आहे.मृग नक्षत्रातील पेरणी यंदा शेतकऱ्यांना पावसाच्या पाण्याअभावी करता येते की नाही,याची चिंता बळीराजाला लागली आहे.यावर्षी मृग नक्षत्राच्या सुरुवातीलाच सिंचनाची सोय असलेल्या शेतकर्यांनी मोठ्या प्रमाणावर कापसाची लागवड केली.तालुक्यात आतापर्यंत ४५ टक्केच्या जवळपास कापसाची लागवड झालेली आहे.कापसाची रोपटी शेतात डोलू लागली आहेत.परंतु पाऊस लांबल्याने जमिनीतील पाण्याची पातळी खोल जात आहे.त्याचबरोबर विजपुरवठा उन्हाचा पारा वाढत असून रोजचे तापमान होत आहे.वेळो अवेळी मिळत असल्याने पिकांना पाणीदेखील देता येत नाही, त्यामुळे शेतातील कापसाची रोपे माना टाकु लागली आहे.त्यामुळे शेतकरी हा दुहेरी संकटात सापडलेला आहे.पाहटे आठ वाजल्यापासून उन्हाचा पारा वाढत असून रोजचे तापमाम साधारण ४५ अंश सेल्सिअसवर जात असल्याने प्रचंड उकाडा जाणवत आहे.बाजारपेठेत शेतकर्यांची पेरणीपूर्व बी- बियाणे,खते खरेदी करण्याचा कल मंदावला आहे. शेतकर्यासह मजुरांना पहाटे वाजल्यापासूनच शेतीकामात वाढत्या तापमानामुळे त्रास होत आहे.
बॉक्समध्ये
उत्पादनावर होणार परिणाम
यंदा समाधानकारक पाऊस पडेल,असा अंदाज हवामान अंदाजाने व तंज्ञाने वर्तविला असला तरी,पाऊस लांबल्याचे पहावयास मिळत आहे.त्यामुळे मशागतीच्या कामाला लागलेल्या शेतकऱ्यांना पावसाची चिंता सतावू लागली आहे.कधी समाधानकारक तर कधी अत्याधिक पाऊस पडत असल्याने गेल्या ५ वर्षांपासून तालुक्यातील शेतकऱ्यांच्या उत्पादनावर परिणाम पडत आहे.
रवि वल्लमवार (सामाजिक कार्यकर्ते) मु.पो.चालबर्डी ता.केळापुर
जि. यवतमाळ
बॉक्समध्ये
पाऊस पडू दे देवा
पहापळ परीसरात ज्या शेतकऱ्यांकडे सिंचनाची सोय आहे.त्यांनी जुनच्या पहिल्या आठवड्यात कपाशी लागवड केली.पण उष्ण तापमानामुळे व विजेच्या लंपडावामुळे निघालेले अंकुरही कोमेजत आहे,अशातच मान्सूनचा पाऊस लांबल्यामुळे यंदातरी समाधानकारक पाऊस पडू दे अशी आशा शेतकरी व्यक्त करत आहे.
सुधीर कोचे (शेतकरी)
मु.पो.पहापळ.ता.केळापुर
जि.यवतमाळ
बॉक्समध्ये
पेरणीची घाई करू नये
शेतकऱ्यांनी धुळपेरणी करायची घाई करू नये.जमीनीत ओलावा चांगल्या प्रकारे असल्यास बि बियाणे खराब होणार नाही,त्याची उगवण क्षमता चांगली राहील व शेतकऱ्यांना दुबार पेरणीला सामोरे जावे लागणार नाही,याची काळजी तालुक्यातील समस्त शेतकऱ्यांना घेणे गरजेचे आहे.
तालुका कृषी अधिकारी पांढरकवडा.
राकेश दासरवार