पांढरकवडा विदर्भ प्रतिनिधी रजा शेख :-पावसाळा अगदी तोंडावर आला असल्यामुळेच येथील नगर परिषद प्रशासनाकडून मॉन्सूनपूर्व शहरातील अंतर्गत मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यास सुरुवात झालेली आहेत.
पांढरकवडा शहरामध्ये एक मोठा भूमिगत नाला वाहत असून,शहरातील मध्यवर्ती भागातील नाल्यांचे पाणी येथेच मिसळून वाहत जाते.शिवाय शहरातील घरगुती सांडपाणी वाहून नेण्यास भूमिगत अंतर्गत लहान नाल्यांची व्यवस्था करण्यात आली आहे.याद्वारेच समस्त शहरातील सांडपाणी बाहेर नदीपर्यंत वाहून नेले जात आहे.लहान नालीमधील कचरा,गाळ आठवड्यात क्वचित एकदा साफ केला जातो.मात्र,वर्षभरात मोठ्या नाल्यांची साफसफाई करण्यात येत नाहीत.सध्या पावसाळा अगदीच तोंडावर
असल्यामुळेच मॉन्सूनपूर्व नालेसफाईला वेग आला आहे.येथील जंगोदाई टेकडी परिसरातून अंतर्गत मोठा शामपुरी नाला वाहत असून,या नाल्यात शहरातील मोठे नाले येऊन समाविष्ट होतात.नाल्यातील सांडपाणी शहरातील विविध भागांतून वाहत जाऊन शेवटी खुनी नदीच्या बाहेरील पात्रात मिसळून जाते. सध्यास्थितीत नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणावर कचरा,गाळ,टाकाऊ पदार्थ पडून आहे.त्यामुळेच पाण्याचा वाहता प्रवाह बरोबर होताना दिसत नाही. दरवर्षीच पावसाळ्यात नाल्याचे पाणी घरात शिरत असल्याची वस्तुस्थिती आहे. त्यामुळेच पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात शिरू नये,म्हणून येथील नगर परिषद प्रशासनाकडून मॉन्सूनपूर्व नालेसफाईला वेग आला आहे.