पांढरकवडा विदर्भ प्रतिनिधी रजा शेख: येथील एकात्मिक आदिवासी विकास विभागा मार्फत अंतर्गत असलेल्या सर्व आश्रमशाळा व वस्तिग्रह येथील तासीका तत्वावर कार्य करणाऱ्या शिक्षक व रोजंदारीवर कार्य करणाऱ्या वर्ग ३/४ वर शासन एक फतवा काढुन सर्व शिक्षक व रोजदारीवर कार्य कलणाऱ्याना कामावरुन काढुन टाकले त्यामुळे आता त्यामुळे गेल्या १० वर्षापासुन कार्यरत कर्मचाऱ्यांवर रोजदारी व तासिका शिक्षकांवर गंडात्तर येणार आहे,म्हणुन हा शासन निर्णय मागे घ्यावा या करीता सर्व ताशिका शिक्षक व श्रेणी ३/४ च्या कर्मचाऱ्यानी प्रकल्प अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी मा. याशणी नागराजन (भाप्रसे ) यांना निवेदन देवुन म्हणाले की बाह्यस्त्रोताव्दारे पदे न भरता रोजंदारीवर भदे भरावी अशी मागणी निवेदनातुन केली गेली आहे
अ.भा.आदिवासी विकास परीषद या मागणी वरुन आश्रमशाळेतील व वस्तिग्रुहातील मुला मुलिंचे शैक्षणीक नुकसान होणार नाही व तासिकावर आमच्या आदिवासी मुलांना एक उच्च शिक्षकांडुन शिक्षण मिळेल व आमचे आदिवासींचे मुलं मुली शिक्षणाच्या प्रवाहात राहतील करीता विकास परिषद या तासिका शिक्षकांना व रोजंदारीवर कर्मचारी म्हणुन काम करणाऱ्या कर्मचारी याच्या सोबत विकास परिषद पाठींबा सह रस्त्यावर उतरु असे यावेळीस त्या तासिका शिक्षक व रोजंदारी कर्मचारी यांना आश्वासन दिले व तास भर चर्चा केली आणी शासन निर्णय चुकिचा आहे असे विकास परिषदेचे संभा मडावी यांनी उपस्थीत सर्वांना संघर्ष करण्याची प्रेरणा दिली यावेळी शिक्षक व रोजंदारी कर्मचारी संजय मडावी ,राहुल पेंन्दोर ,स्वप्निल आत्राम ,पुजा सुभाष चौधरी ,शुभांगी राठोड ,अनामिका कुमरे ,मनिषा कुमरे ,निलीमा गेडाम ,जया लेंडे मनिषा पारधी ,अश्विनी पिंगळे , अनिता तोडसाम,शिलाबाई कुमरे ,आरती जुमनाके मेघा चांदेकर ,आकाश आत्राम ,पायल गिनगुले ,श्रिकांत सककावार जयश्री भुरके , के टी वेट्टी व बहुसंख्येने तासिका शिक्षक व रोजंदारी कर्मचारी उपस्थीत होते