२ अटकेत ५ फरार पोलिसांचा तपास जारी
शेतीच्या रस्त्याचा वाद विकोपाला गेला यातून सात जणांनी संगणमत करीत कुराडीने वार करीत साठ वर्षीय इसमाचा खून केला अशी घटना काल रविवार दिनांक 11 च्या मध्यरात्री अडीच वाजताच्या दरम्यान घडली. यात दोन आरोपींना अटक करण्यात आली असून उर्वरित पाच आरोपी फरार असल्याची माहिती सूत्रांनी दिली पांडुरंग रामजी चव्हाण वय साठ वर्ष राहणार वडगाव आरंभी याला गावातीलच सात जणांनी वेदम मारहान करीत डोक्यावर कुराडीने घाव घालून हत्या केली. पांडुरंग हा आपल्या शेतातून रस्त्यावर आल्यावर गावातील विशाल विठ्ठल राठोड सह 6 जणांनी जबर मारहाण करीत डोक्यावर मानेवर कुराडीने घाव घातले यावेळी पांडुरंग चव्हाण ओरडत असताना शेत शेजारी नागोराव रामचंद्र तिवसकर वय 64 राहणार आमला याने काय झाले बघण्यासाठी गेले असता त्यालाही जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असे सांगितले जात आहे .रक्ताच्या थारोळ्यात पडून असलेले पांडुरंग चव्हाण याला दिग्रस ग्रामीण रुग्णालयात दाखल केले असता त्याची प्रकृती चिंताजनक असल्याने त्यांना यवतमाळ शासकीय रुग्णालयात उपचारासाठी हलवण्यात आले तेव्हा काल रात्री अडीच वाजताच्या सुमारास त्याची प्राणज्योत मावळली या प्रकरणी दिग्रस पोलिसांनी खुणाचा गुन्हा नोंद करून दोन आरोपीला अटक केली अशी माहिती मिळत होती. व या घटनेतील पाच लोकांचा शोध घेणे चालु असल्याची माहिती शहरा सह तालुक्यात वाऱ्या सारखी पसरली असताना या प्रकरणाची महिती घेण्या साठी जन संग्राम चे प्रतिनिधि पोहचले असता सध्या तपास चालु आहे सविस्तर माहिती सायंकाळी ८वाजता देण्यात येईल असे तपास अधिकारि सहायक पोलीस उप निरीक्षक मानकर यांनी सांगीतले