वणी:-- विदर्भ प्रतिनिधि रजा शेखव णी शहरात होणारा दुषित पाणी पुरवठा व पाणी करात केलेली वाढ तात्काळ मागे घ्या.या मागणीचे निवेदन अजिंक्य शेंडे युवासेना उपजिल्हा प्रमुख यांनी जिल्हाधिकारी यवतमाळ यांना मागणी केली आहे.
त्यांनी निवेदनात नमूद केले आहे की,वणी नगरपरिषदेने वित्तिय वर्ष २०२३ ते २०२४ या वर्षीत पाणी करांमध्ये ५० रुपये दरमहा वाढ करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा ठराव २३ फेब्रुवारी २०२३ रोजी घेण्यात आला.आता वणीकर नागरिकांना पाणी करात ६०० रुपये वार्षिक भुर्दंड सोसावा लागणार आहे. तसेच वणी शहरात अनेक प्रभागात मागील वर्षी पासून तीन दिवसा नंतर पाणीपुरवठा केला जातो. म्हणजे महिन्यात १० दिवस पाणी पुरवठा होतो.वर्षीच्या ३६५ दिवसांत काही नागरिकांना १२० दिवस पाणी मिळत आहे. पण पाणी कर पुर्ण वर्षीचा भरावा लागत आहे. हा नागरिकांवर अन्याय आहे.आणी त्यातही काही प्रभागात दुषीत पाणी पुरवठा होत आहे. जनतेच्या आरोग्याशी व जिवनाशी नगरपरिषदेने जो खेळ सुरू केला आहे.तो त्वरीत थांबवावा जर दररोज पाणी पुरवठा होत असेल तर वाढीव पाणी कर भरण्यास हरकत नाही.
या चुकीच्या धोरणाचा युवा सेना निषेध करुन व नगरपरिषदेच्या विरूद्ध असहकार आंदोलन करण्याचा निर्णय घेतला आहे.जर नगरपरिषदेचे कर्मचारी व अधिकारी नागरिकांच्या घरी जाऊन पाणी कर भरण्यासाठी बळजबरी करीत असेल व त्यांचे सोबत वाद झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद केले आहे.
यावर नगरपरिषद प्रशासन काय कारवाई करणार याकडे वणीकर नागरिकांचे लक्ष लागले आहे.