नेर येथे भारत मुक्ती मोर्चा ने दिले निवेदन. विदर्भ प्रतिनिधी रजा शेख नेर :- युनिटी ऑफ मूलनिवास संघटनेच्या नावाखाली बामसेफ या संघटनेचे नावाचा लोगो व रजिस्ट्रेशन नंबरचा गैरवापर करून समाजातून खंडणी गोळा करून त्याचा गैरवापर करणाऱ्या कमलकांत काळे व तसेच ॲट्रॉसिटी मधील आरोपी अशोक भाटकर यास पाठीशी घालून त्याला पळून जाण्यासाठी सहकार्य करणे, तपासात दिरंगाई करून न्याय नाकारणे या कारणाने तपास अधिकारी API मनोज भोसले यांना त्वरित निलंबन करण्यासाठी तसेच डॉक्टर धर्मकारे यांची उमरखेड जिल्हा यवतमाळ येथे झालेली हत्या, अक्षय भालेराव या युवकाची जिल्हा नांदेड येथे झालेली हत्या शरद नामदेव बढे राहणार भोसा जिल्हा बुलढाणा यांची झालेली हत्या अशा अनेक घटना घडत असताना पोलीस प्रशासनाच्या कार्यवाहीत दिरंगाई दिसून येत आहे, अशा पोलीस प्रशासनातील अधिकाऱ्यांवर त्वरित निलंबनाची कारवाई करण्यात यावी या करिता भारत मुक्ती मोर्चा नेर च्या वतीने माननीय ठाणेदार यांच्या माध्यमातून मा.अतिरिक्त पोलीस अधीक्षक यांना निवेदन देण्यात आले आहे, आंदोलनातील निवेदनाचा हा पहिला टप्पा संपूर्ण महाराष्ट्राच्या जिल्हा व तहसीलमध्ये करण्यात आला आहे, सदर घडलेल्या घटना संदर्भात पोलीस प्रशासनाने व गृह खात्याने तपासात दिरंगाई केल्यास भारत मुक्ती मोर्चा संपूर्ण महाराष्ट्रात चरणबद्ध आंदोलनाचा दुसरा टप्पा 16 जून जिल्हास्तरीय धरणे, तिसरा टप्पा 24 जून जिल्हास्तरीय रॅली, चौथा टप्पा 16 जुलै एक लाख लोकांचा भव्य मोर्चा सामाजिक न्यायासाठी गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर निवासस्थानी घेराव केला जाईल, सदर प्रशासनाने याची नोंद घ्यायला पाहिजे असे भारत मुक्ती मोर्चा च्या वतीने सांगण्यात आले आहे, भारत मुक्ती मोर्चाचे तालुका अध्यक्ष सुकलालजी देशपांडे यांनी तपासातील होणाऱ्या दिरंगाईची सदर माहिती पोलीस प्रशासनाला देऊन निवेदन दिले यावेळी वासुदेवराव शेंडे, साजिद खान, प्रवीण रंगारी, अरविंद पाटील, राजीव डफाडे, प्रफुल बोडदे, रजा शेख, देवराव साठे, सुनील गवई, डॉ. अशोक खोब्रागडे, हिरालालजी चोखांद्रे, इत्यादी उपस्थित होते.
तपासात दिरंगाई करणाऱ्या API मनोज भोसले याचे त्वरित निलंबन व्हावे
By -
June 06, 2023
0
Tags: