(निशुल्क शिकवणीतून पाटील सरांनी दिला यशाचा मूलमंत्र )
करंजी रोड: विदर्भ प्रतिनिधी रजा शेख: केन्द्र सरकार द्वारा संचालित ' जवाहर नवोदय विद्यालय ' च्या स्पर्धा परीक्षेत घवघवीत यश मिळवित पांढरकवडा येथील कु .स्वाती कृष्णा नुग्गुरवार , कु . आराध्या जिड्डेवार , पार्षद सुहास मोहूर्ले व आयुष मोहन गेडाम या चार ' विद्यार्थ्यांची निवड यवतमाळ जिल्हयातील घाटंजी ( बेलारी ) येथील नवोदय विद्यालयात झालेली आहे .सदर विद्यार्थी हे इरा इंग्लिश स्कुल आणि गुरुकुल इंग्लिश स्कुल पांढरकवडा येथील विद्यार्थी असून ते आपल्या यशाचे श्रेय त्यांचे आई , वडील , आपल्या शाळेतील शिक्षक , मुख्याध्यापक व त्यांची निःशुल्क शिकवणी घेणारे श्री .विनोद पाटील सर पांढरकवडा यांना देतात .पाटील सर हे जिल्हा परिषद शाळा मुंझाळा येथे शिक्षक असून त्यांनी आपल्या निशुल्क शिकवणी वर्गाच्या माध्यमातून अनेक विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेसंबंधित शिकवण आणि मार्गदर्शन देत आहे. त्यांच्या शिकवणुकीत 4 विद्यार्थ्यांनी नवोदय परीक्षेत यश संपादन केल्याने विद्यार्थी तसेच पाटील सरांवर संपूर्ण तालुक्यातुन शुभेच्छा वर्षाव होत आहे.