वाशिम विदर्भ प्रतिनिधि रजा शेख ; स्थानिक, मातोश्री शांताबाई गोटे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय वाशिम येथील लोकप्रशासन विभाग प्रमुख प्रा. डॉ. विलास गायकवाड यांची विदर्भातील तीनही विद्यापीठाच्या लोकप्रशासन अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नियुक्ती कुलगुरू द्वारा करण्यात आली आहे.
विदर्भातील संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ अमरावती, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ नागपूर व गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली या तीनही विद्यापीठाच्या लोकप्रशासन अभ्यास मंडळावर प्रा. डॉ. विलास गायकवाड यांची पाच वर्षासाठी त्या त्या विद्यापीठाच्या कुलगुरू द्वारे नियुक्ती करण्यात आली आहे.
या पूर्वीही ते संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या लोकप्रशासन अभ्यास मंडळावर सदस्य म्हणून नियुक्त होते. महाराष्ट्रातील नामांकित लातूर येथील राजश्री शाहू (स्वायत्त) महाविद्यालय या महाविद्यालयाच्या लोकप्रशासन अभ्यास मंडळावर सदस्य आहेत.
या नियुक्ती बद्दल त्यांचा महाविद्यालयात महाविद्यालयाचे अध्यक्ष डॉ. नारायणराव गोटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी डॉ. नारायणराव गोटे यांनी प्रा.डॉ. गायकवाड यांची वेगवेगळ्या विद्यापीठावर नियुक्ती होणे हे महाविद्यालयासाठी अभिमानास्पद आहे त्यामुळे महाविद्यालयाचे नाव उंचावण्यात मदत झाली आहे असे गौरवोद्गार काढले.
सत्काराला उत्तर देताना प्रा. डॉ. गायकवाड यांनी वेगवेगळ्या विद्यापीठाच्या अभ्यास मंडळावर नियुक्ती होणे हे आनंदाचे आहे परंतु त्यासोबतच आव्हान सुद्धा आहे कारण नवीन शैक्षणिक धोरणानुसार विद्यार्थ्यांच्या हिताचा अभ्यासक्रम तयार करण्याची संधी आपणाला मिळाली आहे तेव्हा ती अगदी प्रामाणिकपणे पार पाडू असे त्यांनी सांगितले. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.