नेर शहर प्रतिनिधी सुनिल वानखेड नेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथून दिनांक ५ मे २०२३ महाकारुणीक तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त भव्य महारॅलीचे आयोजन मैञी बौद्ध विहार चॉरिटेबल ट्रस्ट नेरच्या वतीने करण्यात आले आहे.
हि भव्य महारॅली दिनांक ५ मे २०२३ रोजी सायंकाळी ६.३० वाजता नेर शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथुन काढण्यात येणार आहे . आणि या भव्य महारॅली मध्ये भंन्ते बुद्धपाल, भंन्ते अश्वोघोष, आचार्य भंन्ते मेधनकर यांच्यासह श्रमानेर भंन्ते तसेच समता सैनिक दल भव्य महारॅली मध्ये उपस्थित राहणार आहेत.
भव्य महारॅली मिरवणूक डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे आल्यावर सामुहिक बुद्ध वंदना झाल्या नंतर उपस्थित सर्व उपासक, उपासिका करीता मैञी बौद्ध विहार चाॅरिटेबल ट्रस्ट आयोजन समिती तर्फे भोजनदान व्यवस्था करण्यात येईल.
वैशाख पौर्णिमा ५ महाकारुणिक तथागत भगवान गौतम बुद्ध जयंती निमित्त दरवर्षी प्रमाणे भव्य महारॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. मैत्री बौद्ध विहार चाॅरिटेबल ट्रस्ट नेर, भीम तरुण उत्साही मंडळ नेर, सिध्दार्थ युवक मंडळ नेर, बौधीसत्व महिला मंडळ नेर, आम्रपाली महिला मंडळ नेर,पंचशील युवक मंडळ पंचशील नगर, तथागत युवक मंडळ अशोक नगर,रमाई महिला मंडळ अशोक नगर, सिध्दनाक बुद्ध विहार अशोक नगर नेर, तरुण उत्साही तथागत मंडळ कोहळा पुनर्वसन नेर, संबोधी बुद्ध विहार संदिप नगर नेर, यशोधरा महिला मंडळ संदीप नगर शिवनगर, संबोधी बुद्ध विहार संदीप नगर, सुजाता महिला मंडळ छत्रपती नगर नेर व डॉ बाबासाहेब आंबेडकर प्रबोधन मंच नालंदा नगर नेर व शहरातील नागरिकांच्या उपस्थितीत ५ मे शुक्रवार सायंकाळी ६ वाजता डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथुन विश्र्वशांती रॅली काढण्यात येईल. जागतिक शांतता , समता, बंधुता , एकता ,विश्र्व कल्याणकारी मानविय तर्कशील तत्त्वज्ञान ,विज्ञाननिष्ठ विश्वकुटुंब संकल्पना बौद्ध तत्त्वज्ञानाचा जगातील सर्वश्रेष्ठ सम्यक संबुध्द मार्ग आहे. बौद्ध हा धर्म नसून धम्म आहे आणि धम्म या नितळ उजेडसंहितेसारखी संहिता जगात कुठेच नाही. "जी व्यक्ती चिकित्सक होते ती धम्म स्वीकारते आणि धम्म स्वीकारते ती व्यक्ती चिकित्सकच होते" विज्ञाननिष्ठ, बुद्धिवादी आणि सर्वानुकंपाय असतो तो माणूस बौद्धच असतो.. यशवंत मनोहर.
चार्वाक, सॉक्रेटिस, आइनस्टाइन, रसेल, पेरियार या विश्वनागरीक प्रज्ञा बौद्धच होत्या आणि यांनी आपल्या आधुनिक तंत्रज्ञाना मधुन आज जगाला विश्र्वशांतीचा मार्ग मानव कल्याणाचा जगातील सर्वश्रेष्ठ मार्ग फक्त बौद्ध तत्त्वज्ञानाचा सम्यक संम्बुध्द एकमेव मार्ग असल्याचे अधोरेखित केले आहे. आणि म्हणूनच "चलो बुध्द की ओर" काळानुरूप संयुक्तिक आहे. भव्य महारॅली मध्ये ३ दिवस श्रामनेर झालेल्या लहान भंते बालकाचा समावेश असेल जे संपूर्ण मानवजातीला शांतीचा, करुणाकारक, सर्वानुकंपाय मानवी कल्याणाच्या मार्गाचा संदेश देतील. भव्य महारॅली मध्ये नेर तालुक्यातील व शहरातील नागरिकांनी उपस्थित राहुन जागतिक शांतता, सामाजिक सौहार्द, राष्ट्रीय एकता, बंधुता निर्माण करावी अशी विनंती आयोजकांनी केली आहे