विदर्भ प्रतिनिधि रजा शेख
पांढरकवडा:-शासन आपल्या दारी उपक्रमात दि.१५ एप्रिल २०२३ ते १५ जुन २०२३ पर्यंत विविध शासकीय योजना/उपक्रम राबविण्याचे शासनाचे निर्देश आहे.त्या अनुषंगाने पांढरकवडा शहरातील इंदिरा नगर प्रभागात शासनाचे योजनेचे विविध लाभ थेट लोकांपर्यंत देण्याकरीता नगर परिषद व महसुल विभाग यांचे संयुक्त विद्यमाने दि.३०/०५/२०२३ ला शिबीराचे आयोजन करून नागरिकांना विविध योजनांची माहिती देवून त्याचे लाभ देण्यात आले.या प्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष तथा उद्घाटक म्हणुन मा. सहा. जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती.याशनी नागराजन (भा.प्र.से.)होत्या तसेच मा.सु. श्री.मेघना कावली (भा.प्र.से.)गटविकास अधिकारी पंचायत समिती,मा.तहसिलदार तथा न.प. प्रशासक श्री.राजेंद्र इंगळे, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिक्षक श्रीमती.डॉ.वैशाली सातुरवार,व नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री.राजु शं. मोट्टेमवार यांची प्रमुख उपस्थिती होती.शासनाचे या उपक्रमात प्रधानमंत्री स्वनिधी योजना ( फेरीवाले /पथविक्रेता), NULM अंतर्गत बचत गटाकरीता योजना,जन्म दाखला,मृत्यु दाखला, उत्पन्नाचा दाखला,संजय गांधी निराधार योजना,श्रावणबाळ योजना,राष्ट्रीय कुटुंब अर्थसहाय्य योजना,प्रधानमंत्री जन आरोग्य योजना,प्रधानमंत्री आवास योजना,रमाई आवास योजना ईत्यादी योजनेसाठी इंदिरा नगर परिसरातील न.प. मराठी शाळेमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले व प्रत्येक योजनेसाठी स्वतंत्र बुथ तयार करून तेथे संबंधीत कर्मचारी तैनात होते.त्यामुळे अगदी वेळेवर आवश्यक ते कागदपत्र सादर करून तलाठी अहवाल देणे, उत्पन्नाचा दाखला देणे,जन आरोग्य ई-गोल्डन कार्ड,जन्म/मृत्यु दाखले देणे, संजय गांधी/श्रावणबाळ निराधार योजनेचा लाभ,नविन राशन कार्ड तयार करून लगेच वितरीत करणे,ह्या सर्व बाबीचा पात्र लाभार्थ्यांना त्वरीत लाभ देवुन शासन आपले दारी उपक्रम राबविण्यात आला आहे.कार्यक्रमाचे सुरूवातीला नगर परिषदेचे मुख्याधिकारी यांनी प्रास्ताविक करून उपक्रमाची रूपरेषा सांगुन योजनेचे महत्व पटवुन दिले तर मा. तहसिलदार यांनी शासनाच्या उपक्रमाची माहिती दिली. आणि मा. सहा.जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी श्रीमती.याशनी नागराजन मॅडम यांनी आपले अध्यक्षीय भाषणात सर्व जनतेला आव्हान केले की, या उपक्रमाचा परिसरातील सर्व नागरिकांनी पूरेपुर लाभ घ्यावा.तसेच आपले शेजारी इतरांना ह्याची माहिती द्यावी म्हणुन मार्गदर्शन केले.या कार्यक्रमासाठी नगर परिषदेचे सर्व अधिकारी,कर्मचारी/शिक्षक/शिक्षकेत्तर कर्मचारी,कंत्राटी कर्मचारी यांनी परिक्षम घेतले.स्वच्छता निरीक्षक श्री.संतोष व्यास ह्यांनी कार्यक्रमासाठी आवश्यक ती सर्व तयारी करून दिली सर्व उपस्थितांना चहा-नास्ता नगर परिषद तर्फे देण्यात आला. नागरिकांना बसण्यासाठी भव्य मंडप व्यवस्था/पाणी व्यवस्था करण्यात आली होती.कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शिक्षक श्री.प्रमोद पुंगुरवार यांनी केले तर श्री.विनोद अंबाडकर न.प.अधिक्षक यांनी सर्व उपस्थितांचे आभार मानुन आभार प्रदर्शनचे सादरीकरण केले, मुख्याधिकारी यांनी सर्व अधिकारी,कर्मचाऱ्यांचे/नागरिकांचे मनापासुन कौतुक करून सर्वांना धन्यवाद दिले.कार्यक्रमादरम्यान प्रधानमंत्री स्वनिधी योजनेत २३ अर्ज प्राप्त झाले,त्यापैकी ५ अर्ज पात्र ठरले. NULM बचत गटासाठी एक अर्ज प्राप्त झाला, जन्म व मृत्युचे एकुण २० दाखले वितरीत केले.महसूल विभागाकडुन वेळेवर तलाठी अहवाल देवून एकुण ६५ उत्पन्नाचे दाखले वितरीत केले. संजय गांधी/श्रावण बाळ निराधार योजनेत ५ अर्ज प्राप्त आले.तर प्रधानमंत्री जनआरोग्य ई-गोल्डन कार्ड यासाठी ११५ लाभार्थी पात्र ठरले.प्रधानमंत्री आवास योजना याकरीता १० अर्ज,अपंग नोंदणीसाठी ५ अर्ज,त्वरीत राशन कार्ड तयार करून देणे यासाठी ३६ दुय्यम प्रत, नवीन ४,नाव समाविष्ट ८ व नाव कमी करणे याकरीता २ राशन कार्ड बनवुन दिले.एकंदरीत इंदीरा नगर परिसरातील नागरीकांनी या उपक्रमाचा लाभ घेऊन शासनाच्या या योजनेचे कोतुक करून समाधान व्यक्त केले आहे.