नेरपरसोपंत विदर्भ प्रतिनिधि रजा शेख :-
छत्रपती संभाजीराजे जयंती महोत्सव समिती, बहुजन क्रांती मोर्चा, मोर्य क्रांती संघ, व विविध संघटनेच्या वतीने येथील छत्रपती संभाजी राजे चौकात शंभूराजांची 366 वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सौ उज्वलाताई चव्हाण (बनसोड) अध्यक्ष, यशोधरा महिला मंडळ,नेर तर प्रमुख पाहुणे म्हणून नेर पोलीस स्टेशनचे पीएसआय बदरके साहेब, मच्छिंद्र कदम, प्रा एन यु धांदे, प्राचार्य प्रवीण बनसोड, किशोर खोब्रागडे, विचारपिठावर उपस्थित होते, सर्वप्रथम सौ उज्वलाताई चव्हाण यांनी संभाजी राजांच्या तैलचित्रास माल्यार्पण करून अभिवादन केले, उपस्थित अनेक वक्त्यांनी छत्रपती संभाजी राजांच्या जीवन चरित्रावर सविस्तर प्रकाश टाकला, संभाजी राजांचा जीवनपट सांगून संभाजी राजे हे केवळ चित्रापुरतेच मर्यादित नसून प्रत्यक्षात आज त्यांना चरित्रात उतरावे लागेल असे मत वक्त्यांनी प्रकट केलेत, कार्यक्रमाचे यशस्वी सूत्रसंचालन एडवोकेट रमेश जुनघरे तर उपस्थितांचे आभार इंजि. संदीप चौधरी यांनी मानले कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता छत्रपती संभाजीराजे जयंती महोत्सव समिती चे नितीन खैरे, प्रा मनोहर देशमुख, प्रशांत ठाकरे, खुशाल मिसाळ शिवसेनाप्रमुख, महात्मा फुले स्मारक समितीचे विनोद गोबरे, मराठा सेवा संघाचे राजेश धोटे, प्रमोद राणे सर, संदीप ठक, सुरेश बघमारे, यशवंत कवासे, प्रकाश भबुतकार नरेंद्र डवरे, मायाताई राणे माजी नगरसेविका, मोर्य क्रांती संघ प्रदेशाध्यक्ष सौ प्रमोदिनीताई मुंदाने ,अनिरुद्ध मुंदाने, बहुजन क्रांती मोर्चा चे सुनील गवई, डॉ अशोक खोब्रागडे, अविनाश शेंडे सर, राम हळदे सर, भारत गवई सर, प्रमोद गायकवाड, मुरलीधर गायकवाड, रजा शेख ,आदीनी अथक परिश्रम घेतले.