नेर विदर्भ प्रतिनिधि रजा शेख :
लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे बघितले जाते. मात्र माध्यमकर्मींच्या प्रश्नाच्या सोडवणुकीच्या दृष्टीने उपाययोजना केल्या जात नाहीत. याकडे लक्ष वेधण्यासाठी व्हॉइस ऑफ मीडिया नेर तालुक्याच्या वतीने विविध मागण्याचे निवेदन माननीय तहसीलदार शिवाजी मगर यांना देण्यात आले . यवतमाळसह संपूर्ण महाराष्ट्रात हे धरणे आंदोलन करण्यात आले आहे.
पत्रकारांच्या विविध मागण्यांमध्ये प्रामुख्याने
पत्रकारांसाठी स्वतंत्र कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्याला भरीव निधी द्यावा, पत्रकारितेत पाच वर्ष पूर्ण केलेल्या पत्रकारांना सरसकट अधिस्वीकृती पत्रिका देण्यात यावी, वृत्तपत्रांना सध्या जाहिरातीवर लागू असलेला जीएसटी रद्द करावा, पत्रकारांच्या घरांसाठी विशेष बाब म्हणून शासकीय भूखंड देण्याचा निर्णय घ्यावा, कोरोनात जीव गमावलेला पत्रकारांना फ्रंट लाईन वर्करचा दर्जा देऊन त्यानुसार मयत पत्रकारांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करावे, शासनाचे सध्याचे जाहिरात धोरण ‘क’ वर्ग दैनिके (लघू दैनिक) यांना मारक आहे. लघू दैनिकांनाही मध्यम (ब वर्ग) दैनिकांइतक्याच जाहिराती देण्यात याव्यात. साप्ताहिकांनाही त्या प्रमाणात जाहिराती द्याव्यात, आदी मागण्यांसाठी हे आंदोलन करण्यात आले आहे, सदर आंदोलन व्हाईस ऑफ मीडिया चे तालुका अध्यक्ष राजेश धोटे यांच्या नेतृत्वात नेर येथील पत्रकार सर्वश्री राहुल मिसळे, पंकज गुल्हाने, साहेबराव सावळे, लक्ष्मण वानखडे, अमृत वासनिक, मनोज झोपाटे, वासिम मिर्झा, रजा शेख, अंकुश रामटेके, सह अनेक पत्रकार या आंदोलनात सहभागी होते