कारंजा येथे इद उत्साहात साजरी
By -
April 22, 2023
0
विदर्भ प्रतिनिधि रजा शेख : मागील एक महिन्यांपासून सुरू असलेल्या रमजान महिन्यातील रोजे (उपवासाची) सांगता आज दिनांक 22 एप्रिल रोजी ईद-उल-फित्र ने साजरी होत झाली.काल दिनांक 21 रोजी संध्याकाळी चंद्र दर्शन झाल्यानंतर शहर व तालुक्यात ईद साजरी करण्याची घोषणा करण्यात आली. यासाठी मुस्लिम धर्मीयांची कालपासूनच लगबग सुरू झाली.त्यासाठी लागणारे दूध,सुकामेवा, कपडे आदीची खरेदी पूर्वीच करण्यात आली होती. आज सकाळी 8 :15 वाजता शहरातील विविध भागातील मुस्लिम धर्मीय समाजातील लोक येथील आस्तना मस्जिद जमा झाले व तेथून शाही इमाम क़ाज़ी इक़बाल यांचे नेतृत्वात जूना बायपास इदगाहकडे रवाना झाले. तेथे क़ाज़ी इक़बाल यांनी शहरातील एकत्रित झालेल्या सर्व मुस्लिम बांधवांना ईद ची नमाज पठण करवीली. ईदगाह वर जाण्यापूर्वी सर्व मुस्लिम बांधवांनी अन्नदान केले होते. नमाजनंतर देशात शांती नांदावी,भाईचारा वाढावा, शेतकरी मजूर वर्ग सुखावा व व्यापारात समृद्धी यावी यासाठी प्रार्थना करण्यात आली. नंतर सर्व मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देताना सुभेच्छा दिल्या व एकमेकांच्या घरी जाउन शीरखुर्मा चा आस्वाद घेतला. नमाज पठणाच्या वेळी इदगाह वर प्रोपर्टी डीलर रिज़वान सेठ पूजानि, ठाणेदार आधारसिंह सोनोने दत्ता राज डहाके, ऍड जुनेद खान ,बिलाल पूजानि ,ज़ाकिर शेख़,विजू भाउ बागडे ,सलीम गारवे, फिरोज शेकुवाले, नदीम राज,उपस्थित होते. यावेळी इदगाह वर पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.
Tags: