पत्रकार पॉलिसीचा वितरण सोहळा
विदर्भ प्रतिनिधि रजा शेख :
व्हॉईस ऑफ मीडिया ही संघटना पत्रकारांचा आवाज बुलंद करण्याचे काम करीत आहे. दिड वर्षापूर्वी स्थापन केलेल्या संघटनेची संपूर्ण देशात संघटनात्मक बांधणी झाली आहे. जे काम दहा वर्षात करु असा उद्देश डोळ्यासमोरुन ठेवुन होतो. परंतु फक्त दिड वर्षातच २८ हजारावर पत्रकार संघटनेत जुळले आहे. पत्रकारांच्या हितासाठी व्हॉईस ऑफ मीडिया पंचसूत्रीवर काम करीत असल्याचे प्रतिपादन व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांनी केले.
व्हाईस ऑफ मिडीया यवतमाळ जिल्हा शाखेच्या वतीने सहकार भवन येथे आयोजित पत्रकार पॉलिसी वितरण सोहळ्यात ते बोलत होते. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधिक्षक डॉ. पवन बन्सोड, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या भोसले, विदर्भ प्रदेशाध्यक्ष मंगेश खाटीक, जिल्हा परिषद कर्मचारी पतसंस्थेचे अध्यक्ष मधुकर काठोळे, सामाजिक कार्यकर्ते भाई अमन, माजी पंचायत समिती सभापती सागर पुरी, अशोक पुरी उपस्थित होते. यावेळी बोलतांना दिव्या भोसले म्हणाल्या की, व्हाईस ऑफ मिडीया ही संघटना नसून पत्रकाराची चळवळ आहे. पत्रकारांचे महामंडळ स्थापन व्हावे. पत्रकारांना सर्वदृष्टीने सक्षम करण्यासाठी काम करायचे आहे असे त्या म्हणाल्या. व्हाईस ऑफ मिडीयाचे जिल्हाध्यक्ष संजय राठोड यांनी प्रास्तविकाच्या माध्यमातून संघटनेचे कार्याची भूमिका मांडली. यावेळी ज्येष्ठ पत्रकार किशोर जुनुनकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी दैनिक लोकसत्ताचे जिल्हा वार्ताहर नितीन पखाले यांची राज्य संघटक म्हणून तर दैनिक पब्लिक पोस्टचे संपादक प्रा. अंकुश वाकडे यांची राज्यस्तरीय संघटनेच्या सदस्यपदी निवड करण्यात आली. त्या निमित्त राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे यांच्या हस्ते नितीन पखाले, प्रा. अंकुश वाकडे यांचा रोपटे देवून सत्कार करण्यात आला. तसेच दैनिक लोकमतचे जिल्हा प्रतिनिधी विशाल सोनटक्के, दैनिक सकाळचे जिल्हा बातमिदार राजकुमार भितकर, पत्रकार संरक्षण समितीचे अध्यक्ष विनोद पत्रे यांचाही सत्कार करण्यात आला. पॉलिसी काढण्यासाठी भारतीय डाक विभगाचे अधिक्षक गजेंद्र जाधव व त्यांची चमु उपस्थित होती. या कार्यक्रमाचे संचालन कैलास राउत यांनी केले. तर आभार सुकांत वंजारी यांनी केले. या कार्यक्रमाला व्हाईस ऑफ मिडीयाचे पदाधिकारी जय राठोड, नितीन भुसरेड्डी, सूरज पाटील, रवी राउत, राहुल वासनिक, विवेक वानखेडे, विजय मालखेडे, पवन लताड, संजय राठोड, गौतम गायकवाड, भिमराव गणविर, रोशन सावंत, धनंजय उपगनलावार, रविश वाघ, सैयद्द मतीन, मकसुद अली, शाकीर अहेमद, किरण कोरडे, राजेश धोटे, अरुण राऊत उपस्थित होते.
चौकट
पत्रकारांना पॉलिसीचे वितरण
व्हाईस ऑफ मिडीयाच्या माध्यमातून शहरासह ग्रामिण पत्रकारांची भारतीय डाक विभागातून एक वर्षासाठी १० लाख रुपयाचा अपघातील विमा काढण्यात आली. यावेळी व्हाईस ऑफ मिडीयाचे संस्थापक अध्यक्ष तथा राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे व प्रमुख पाहुण्याच्या हस्ते २५ जणांना प्रातिनिधीक स्वरुपात पॉलिसचे वितरण करण्यात आले. या कार्यक्रमात उपस्थित पत्रकारांनी पॉलिसी काढली. जिल्ह्यातील अन्य पत्रकारांची पॉलिसी काढण्यासाठी पोस्टाचे खाते काढले असून , लवकरच त्यांना पॉलिसी देण्यात देण्यात येणार आहे.