विदर्भ प्रतिनिधि रजा शेख
महामानव भारतरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर जयंती पर्वावर ग्रामपंचायत भवन काजळेश्वर येथे ३३ दिव्यांग बांधवांना त्यांच्या राखीव निधीतून किराणाकीटचे वाटप सरपंच नितीन पा उपाध्ये ;ग्रामविकास अधिकारी सतीश वरघट यांचे हस्ते करण्यात आले .
प्रहार जनशक्ती पक्ष शाखा काजळेश्वरचे सेवक प्रदीप उपाध्ये यांचे सूचनेनुसार गावातील दिव्यांगांना आर्थीक कौटूंबीक आधार व्हावा करीता किराणाकीट गावचे सरपंच नितीन पा . उपाध्ये व ग्रामविकास अधिकारी सतीश वरघट यांनी दिल्यात . याप्रसंगी उपसरपंच तैसीमभाई ;समाजसेवी सुभाष पा . उपाध्ये ;हर्षल उपाध्ये ;विनोद उपाध्ये ;ग्रा.पं. सदस्य गण ;सोसायटी सद्स्यगण ;ग्रा.पं. कर्मचारी वृंद गावातील मान्यवर यांची उपस्थिती होती . प्रास्ताविकातून प्रहार सेवक प्रदीप उपाध्ये यांनी दिव्यांगाना त्यांच्या राखीव निधीतून ग्रा.पं. ने किराणा किट देऊन दिलेला आधार याबाबत आनंद व्यक्त केला . तर संचलन निकेत उपाध्ये आभार प्रदर्शन हरीदास चौधरी यांनी केले .