जिल्हा प्रतिनिधि रजा शेख: व्हाईस ऑफ मीडिया, यवतमाळतर्फे पत्रकार पॉलिसी वितरण सोहळा गुरुवारी (ता.20) सकाळी अकरा वाजता आर्णी रोडवरील सहकार भवनात आयोजित करण्यात आला आहे.
अध्यक्षस्थानी व्हाईस ऑफ मीडियाचे राष्ट्रीय अध्यक्ष संदीप काळे तर, उद्घाटक म्हणून पालकमंत्री संजय राठोड उपस्थित राहणार आहेत. प्रमुख पाहुणे म्हणून खासदार भावना गवळी, आमदार मदन येरावार, आमदार अॅड. नीलय नाईक, आमदार डॉ. संदीप धुर्वे, आमदार नामदेव ससाणे, आमदार संजीवरेड्डी बोदकुरवार, जिल्हाधिकारी अमोल येडगे, पोलिस अधीक्षक डॉ. पवन बन्सोड, प्रदेशाध्यक्ष अनिल मस्के, राष्ट्रीय कार्यालयीन सचिव दिव्या पाटील भोसले, विभागीय अध्यक्ष मंगेश खाटिक, अमरावतीच्या उपायुक्त माधुरी मडावी, मुख्याधिकारी दादाराव डोल्हारकर, जिल्हा माहिती अधिकारी मनीषा साळवे, तहसीलदार कुणाल झाल्टे, मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष प्रा. टिकाराम कोंघरे, गोदावरी बँकेचे व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, जिल्हा परिषद कर्मचारी संस्थेचे अध्यक्ष मधुकर काठोळे, पुसद अर्बन बँकेचे अध्यक्ष शरद मैंद, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्याम जयस्वाल, समाजसेवक भाई अमन, तारिक साहीर लोखंडवाला, सागर पुरी आदी मान्यवर उपस्थित राहतील. या सोहळ्याला उपस्थित राहण्याचे आवाहन व्हाईस ऑफ मीडियाच्या वतीने करण्यात आले आहे.