असंख्य बहुजन बांधवांच्या उपस्थित मौर्य क्रांती संघ शाखेच्या फलकाचे अनावरण.
नेर जिल्हा प्रतिनिधि रजा शेख:- पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक येथे मौर्य क्रांती संघाच्या नेर तालुक्याची पुरुष व महिला कार्यकारणी समितीची स्थापना झाली व मौर्य क्रांती संघाच्या फलकाचे अनावरण फटाक्याच्या आतिषबाजी मध्ये करण्यात आले, यावेळी मोठ्या संखेने नागरिक उपस्थित होते, कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मौर्य क्रांती संघाचे महाराष्ट्र राज्याचे सचिव प्रताप दादा पाटील उपस्थित होते , धनगर बांधवांना सशक्त बनवण्याचे काम मौर्य क्रांती संघाचे असून समाजापुढील समस्या सोडवण्यासाठी कटिबद्ध असल्याचे त्यांनी सांगितले, आपले बाप दादा सम्राट अशोकाच्या राज घराण्याशी असून आज धनगर समाजाची वर्तमानातील परिस्तिथी दैनिक का आहे असा प्रश्न उपस्थित करून धनगर समाजाने याचे चिंतन व मनन करायला पाहिजे असे प्रतिपादन त्यांनी यावेळी केले. मौर्य क्रांती संघ घराघरात पोहचवून समाजाला वैचारिक समृद्ध करण्याचे काम आम्ही निरंतर करू असे मत कार्यक्रमाचे उद्घाटक मौर्य क्रांती संघाचे विदर्भ प्रभारी मा. उत्तमराव सुरनर यांनी व्यक्त केले, ज्या समाजा मध्ये आपण जन्माला आलो त्या समाजाला आपलं काही देणं असत व म्हणून मौर्य क्रांती संघाच्या माध्यमातून आपल्या मौर्य कालीन वंशजांचा इतिहास समाजा मध्ये पोहचवु असे मत मौर्य क्रांती संघाचे जिल्हा अध्यक्ष मा.सचिन वायकडे यांनी व्यक्त केले. यावेळी मौर्य क्रांती संघाचे राज्य कार्यकारणी सदस्य मा. पार्थ शिंदे यांनी मौर्य कालीन इतिहास सर्वांसमोर ठेऊन मौर्य घराण्याशी अवगत केले, यावेळी कार्यक्रमाचे संचालन मौर्य क्रांती संघाच्या महाराष्ट्र राज्य प्रदेश अध्यक्ष मा. प्रमोदीनिताई मुंदाने यांनी करून मौर्य क्रांती संघाच्या कार्यप्रणाली विषयी विस्तृत माहिती दिली कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मा.प्रशांत उघडे सर यांनी केले तर आभार प्रदर्शन मा. गोपाल कोल्हे सर यांनी केले.
मौर्य क्रांती संघाच्या नेर तालुका अध्यक्षपदी मा.अनिरुद्ध मुंदाने, शहर अध्यक्ष मा. गोपाल कोल्हे, ता. उपाध्यक्ष मा.रामचंद्र महल्ले, शहर उपाध्यक्ष मा.किशोर दाढे, सचिव मा.प्रशांत उघडे, सह सचिव मा.दिनेश वांगे, कोषाध्यक्ष मा.संजय ढोक, सह कोषाध्यक्ष मा.रामभाऊ गायनर, व सदस्य मा.गोकुळ अवघड, मा.प्रवीण कचरे, मा.शिवम तुपटकर,यांची वर्णी लागली असुन मौर्य क्रांती संघ महिला कार्यकारणी मध्ये तालुका अध्यक्ष रेखाताई देवकते, शहर अध्यक्ष जयाताई उघडे, ता. उपाध्यक्ष जयाताई तुपटकर, शहर उपाध्यक्ष रूपालीताई नवरंगे, सचिव रंजनाताई गायनर, सह. सचिव शिल्पाताई ढगे, कोषाध्यक्ष उज्वलाताई महल्ले, सह. कोषाध्यक्ष सपनाताई मासाळ, व सदस्य हेमलताताई भोकरे, सारिकाताई कोल्हे, हर्षालीताई घोडे, सुषमाताई वांगे, कांताताई गायनर, वर्षाताई गायनर, अश्विनीताई उघडे, वंदनाताई ठोसर, वंदनाताई कोल्हे याची वर्णी लागली, यावेळी कार्यक्रमाच्या यशस्वीते करिता पुं. अहिल्यादेवी होळकर जयंती उत्सव समिती व सर्व नागरिकांनी साथ सहयोग दिला.