नेर (जिल्हा प्रतिनिधि रजा शेख):- येथील नेहरू महाविद्यालयात शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या वतीने प्रत्येक शनिवारी सकाळी महाविद्यालयाच्या परिसरात श्रमदान करण्यात येत असून महाविद्यालयाचा परिसर स्वच्छता व वृक्ष संवर्धन करण्यात येत आहे. मानवी जीवना करीता वृक्षांचे महत्त्व लक्षात घेवून व दिवसे न दिवस होत असलेला पर्यावरणाचा ऱ्हास,यातून वाढलेले पृथ्वीचे तापमान व त्याचा मानवी जीवनावर होणारा प्रतिकुल परिणाम सर्वजण भोगत आहेत, परंतु कृतिशीलता दिसून येत नाही, त्यामुळे वृक्ष लागवड,वृक्ष संगोपणा बरोबरच वृक्षांची निगा राखणे याबाबत प्रत्येकांने आपल्या परिसरातील पर्यावरणाचे रक्षण करणे हे प्रत्येकाचे कर्तव्य आहे असे आवाहन प्राचार्य डॉ.प्रवीण बनसोड यांनी केल्यामुळे शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी दर शनिवारला महाविद्यालयाच्या परिसरात श्रमदानाला सुरूवात केली.आज महाविद्यालयातील सर्व परिसर एक रमणिय ठिकाण ठरले आहे.याकरीता महाविद्यालयातील ग्रंथपाल सुरेश इंगळे, राजेंद्र ढगे, ललित पालीवाल, सुरेन्द्र नवरंगे, संदेश बांबोर्डे,कु.भारती देवतारे,अनिकेत देशमुख,जयराम शेंबाडे, इरफान पठाण,निलेश सिरसाठ,अमोल अघम तसेच प्रा एम आर ठाकरे, डॉ एम डी वढते, प्रा एम यु अर्जुने, डॉ. व्ही ए खोडस्कर यांचे सहकार्य लाभत आहे.