आजंती येथे दारूचा महापूर दारूबंदीसाठी महिलांनी दिले निवेदन
By -
March 30, 2023
0
जिला प्रतिनिधि रजा शेख :- नेर तालुक्यातील आजंती येथे मोठ्या प्रमाणात अवैध दारू विक्री केली जात असून गावातील अनेक परिसरात हातभट्टी दारूचा व्यवसाय जोमात सुरू आहे, या अवैध व्यवसायामुळे गावातील अनेक कुटुंब देशोधडीला लागले असून अनेक संसाराची वातहात झाली असल्याने येथील महिलांनी एल्गार पुकारला व अशा अवैध हातभट्ट्या व दारू विक्री व्यवसाय करणाऱ्या लोकांविरुद्ध महिलांनी पोलीस स्टेशनला दारू बंद करण्याबाब निवेदन देऊन कारवाईची मागणी केली आहे.
याबाबत सविस्तर वृत्तांत असा की अजून ती गावात जागोजागी गावठी दारू मिळत आहे या द दारूपायी अनेक तरुण व्यसनाधीन झाले असून अनेक संसार उध्वस्त झाले आहेत, दारू पिण्यामुळे अनेक कुटुंबात रोजचे कलह निर्माण होताना दिसते, तसेच लहान मुलांच्या शिक्षणावरही परिणाम झालेला दिसतो , दारूपायी अनेक तरुण मृत्यूच्या सापळ्यात सापडलेले असून अनेकांचा मृत्यू झाला आहे, घरात नेहमी कलह निर्माण होत असल्याने तरुण मुलींची विवाह जुळत नसल्याची ही तक्रार अनेक महिलांनी केली असून याबाबत सर्व महिला एकत्रित होऊन पुढाकार घेऊन नेर पोलीस स्टेशनला तक्रार दाखल करण्यात आली असून संबंधित ठाणेदारांनी यावर त्वरित ठोस निर्णय घ्यावा अशी विनंती करण्यात आली आहे निवेदन देते समय आजन देतील मला प्रामुख्याने सौ दिपाली राठोड, तनवी आडे, रूपाली चव्हाण, सुलोचना आडे, अरुणा आडे, आरती पवार, आशा राठोड, यांच्या नेतृत्वात अनेक महिलांनी सयानिशी नेर येथील पोलीस निरीक्षकांना निवेदन दिले असून त्वरित कारवाईची मागणी केली आहे.
Tags: