नेर :-(जिल्हा प्रतिनिधी रजा शेख) देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचे रणशिंग फुंकुण निस्वार्थपणे आपल्या प्राणाची आहुती देणारे, करोडो युवकांचे प्रेरणास्थान, थोर क्रांतिकारक शहीद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव यांच्या शहीद दिनी टोलीपुरा येथे अभिवादन सभा पार पडली.प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून उपस्थित पाहुण्यांनी मेणबत्ती प्रज्वलित केली. उपस्थित नागरिकांनी सुद्धा फुले वाहून त्यांच्या कार्याला व देशभक्तीला सलाम करत त्याच्या स्मृतीस अभिवादन केले.
यावेळी सैन्यात कार्यरत असलेले सैनिक श्री पनव कवासे यांना कार्यक्रमाचे अध्यक्षांनी भगतसिंग यांनी स्वतः लिहिलेले "आम्ही कशासाठी लढत आहोत" हे पुस्तक भेट देण्यात आले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. प्रवीण बनसोड होते.
संचालन व
प्रास्ताविक मा.वैभव सुरेशराव बगमारे यांनी केले.
प्रमुख पाहुणे म्हणून
मा. खुशाल मिसाळ,
मा. सुनीलजी गवई,
मा. रविभाऊ मुंदाने,
मा. गणेशाआप्पा झाडे
मा. शरदराव मोरे
मा.प्रभूदासजी कासार,
मा.गौरव नाईकर,
मा. सोळंके काका उपस्थित होते.कार्यकमाचे अध्यक्ष डॉ प्रवीण बनसोड यांनी, स्वातंत्र्याचा अर्थ सांगताना समता व न्यायाशिवाय समाजाला अर्थ नाही, असे मनोगत व्यक्त केले.
यावेळी सर्वांनी 2 मिनिट डोळे मिटून शहिदांच्या कार्याची आठवण करून मौन पाळले. शहीद भगतसिंग मित्र मंडळ टोलीपुरा नेर यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले.