जिला प्रतिनिधि रजा शेख :-
भारतात दर मिनिटाला दोन क्षयरोग रुग्ण मृत्युमुखी पडतात. अशा रुग्णांना घरात घृणास्पद वागणूक दिली जाते. त्यामुळे क्षयरोगा विषयी गैरसमज दूर करणे आवश्यक आहे, योग्य औषधोपचार व काळजी घेतल्यावर क्षयरोग पूर्णपणे बरा होतो असे मत मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ श्रीकृष्ण पांचाळ यांनी जिल्हा परिषदेत क्षयरोग दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात व्यक्त केले,
जागतिक क्षयरोग दिनानिमित्त जिल्हा परिषद सभागृहात हा कार्यक्रम घेण्यात आला, यावेळी डॉ पांचाळ अध्यक्षपदावरून बोलत होते, यावेळी मंचावर डीएचओ डॉ पी एस चव्हाण,
(सी एस), डॉक्टर आर डी राठोड ,जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ सागर जाधव, बाल संगोपन अधिकारी डॉ पी एस ठोंबरे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ क्रांतीकुमार नावंदेकर, डॉ शरद राखुंडे, डॉ रत्नपारखी, प्रामुख्याने मंचावर उपस्थित होते, क्षय रोगाचे संपूर्ण निर्मूलन 2025 पर्यंत करायचे आहे त्यासाठी 63 प्राथमिक आरोग्य केंद्र व 57 ग्रामीण रुग्णालय एक वैद्यकीय महाविद्यालय 42 मान्यता प्राप्त सूक्ष्मदर्श केंद्रे आणि अनेक डॉट्स प्रोव्हायडर कार्यरत आहेत, क्षयरोग दिनानिमित्त प्रत्येक तालुक्यातील एक अशा उत्कृष्ट आशा स्वयंसेविकेला प्रशस्तीपत्र देऊन सन्मान करण्यात आला, कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ जाधव यांनी केले तर सूत्रसंचालन शशांक चुंबळे यांनी केले, आभार रुपेश फुसे यांनी मानले, कार्यक्रमाला जिल्ह्यातील अनेक आरोग्य सहायक आणि कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतलेत.