नेरपरसोपंत रजा शेख:- स्वच्छ भारत मिशन अंतर्गत नेर नगर परिषद हद्दीतील नागरिकांना वैयक्तिक शौचालय बांधण्यासाठी केंद्र आणि राज्य शासनाकडून मोठ्या प्रमाणात निधीचे वाटप करण्यात आले, त्यासाठी सण 2016 ते 2022 या कालावधीमध्ये वैयक्तिक स्वच्छालयाच्या अनुदानासाठी नेर नगर परिषदेला मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध झाला ,
मात्र एकूण मिळालेल्या निधीमधून वैयक्तिक स्वच्छतेच्या लाभार्थ्यांना वाटप करण्यात आलेला नाही, आणि त्यातून शिल्लक राहिलेला निधी यामध्ये करोडो रुपयांचा घोळ असल्याची माहिती अधिकारांतर्गत मागितलेल्या माहिती मधून दिसून येत आहे, तसेच दिलेल्या माहितीमध्ये शेकडो लाभार्थ्यांची नावे दोन वेळा आलेली आहे, त्यामुळे ही योजना राबवताना मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याचे दिसून येते, हा सर्व प्रकार अतिशय गंभीर असून यामध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार झाल्याचे नाकारता येत नाही, या प्रकरणाची चौकशी करून दोषीवर निलंबनाची कारवाई करावी, अन्यथा या विरोधात मनसे नेर तालुक्याच्या वतीने उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा मनसे नेर तालुका अध्यक्ष बाळासाहेब कठाने यांनी दिला आहे, दिलेल्या निवेदनात मनसेच्या अनेक कार्यकर्त्यांच्या तथा पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत