भंगार बसेस रस्त्यावर सोडणे बंद करा. थेट मा.मुख्यमंत्री (म.रा.) यांना बहुजन मुक्ति पार्टी चा भंगार बसेस बंद न केल्यास आंदोलन करण्याचा इशारा.
जिला प्रतिनिधी र रजा शेख:- महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या भंगारात निघालेल्या गाड्या ह्या रस्त्यावर धावत असून होणाऱ्या अपघातामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात येत आहे याची दखल महाराष्ट्र सरकार घेत नसुन सरकारला जनतेच्या जीवाची परवा नाही असा प्रश्न बहुजन मुक्ती पार्टीचे यवतमाळ/ वासिम लोकसभा मतदारसंघाचे महासचिव बिमोद मुधाने यांनी उपस्थित केला.
अमरावती आगाराची शिवशाही बस क्रमांक MH 06 BW 0236 ही अमरावती वरून यवतमाळला जात असताना लासीना या गावा जवळ गाडीची काच अचानक पडल्याने चालकाच्या सतर्कतेने मोठा अपघात होण्यापासून टळला यामध्ये चालक व्ही.पी. ढोलवाडे यांना दुखापत झाली असून कोणतीच जीवित हानी झाली नाही, बिमोद मुधाने हे यवतमाळ वरून आपली मीटिंग आटोपुन घरी परत जात असताना सदर घटना त्यांच्या निदर्शनात आली त्यांची गाडी रस्त्यावरून जात असताना अमरावती आगाराची शिवशाही बस गाडी ही उभी असताना वाहक महिला एन एन दहिवलकर ह्या रस्त्यावर एकट्या उभ्या होत्या त्यांच्यासोबत बिमोद मुधाने यांनी विचारणा केली असता सदर बाब लक्षात आली भंगारात निघालेल्या गाड्या ह्या सरकारने आगारातून बाहेर काढू नये व प्रवाशांच्या जीवाशी चालक व वाहकांच्या जीवाशी खेळ खेळू नये असा इशारा सुद्धा बिमोद मुधाने यांनी सरकारला दिला व भविष्यात अशा घटना घडत गेल्यास याची सर्वस्वी जबाबदारी ही महाराष्ट्र शासनाची व आगार प्रमुखांची राहील त्यांनी प्रवाशांच्या जीवाशी खेळ चालू ठेवल्यास येणाऱ्या काळात आम्ही पूर्ण महाराष्ट्रभर आंदोलन करू असे सुद्धा त्यांनी सांगितले.