जिला प्रतिनिधि रजा शेख :- न्यायालयाने काँग्रेसचे माजी अध्यक्ष खासदार राहुल गांधी यांना एका प्रकरणात शिक्षा ठोठावल्यावर चोवीस तासाच्या आत लोकसभा सचिवालयाकडून यांचे खासदारकी रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला.
या निर्णयाचा निषेध म्हणून नेर तालूका युवक काँग्रेसच्या वतिने डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात एकत्रित जमा होऊन युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्याला पुष्पमाला अर्पण केली,
केंद्र शासनाच्या विरोधात नारेबाजी करून निषेध करण्यात आला.यावेळी अनेक युवकांनी आपापली भुमिका माडली.यावेळी सतिश चवात म्हणाले की, सदृढ लोकशाही मध्ये विरुद्ध पक्ष असणे आवश्यक आहे. मात्र गेल्या नऊ वर्षात मोदीच्या काळात जनतेचे प्रश्न घेऊन आवाज उठवतात त्यांच्या मागे ईडी, सीबीआय यांच्या चौकशी लाऊन त्यांना तुरुंगात दाबल्या जाते.अनेक प्रकरणात आवश्यक पुरावे दाखल न केल्याने न्यायालयाने ईडी व सिबिआय यांच्यावर ताशेरे ओढले आहे. खासदार राहुल गांधी यांच्या भारत जोडो अभियानानंतर देशातील जनता काॅग्रेस च्या बाजूने उभी राहत आहे. व भाजप सरकारच्या विरोधात जनमत तयार होत आहे. त्यामुळे भाजपचे नेते राहुल गांधी यांना कुठेतरी अडकविण्याच्या प्रयत्न्नात होतेच व आयती संधी मिळाली. वास्तविक न्यायालयाने शिक्षा ठोठावल्यावर त्यांना शिक्षेच्या विरोधात न्यायालयात कायदेशीर दाद मागण्यांचा अधिकार असतानाही भाजपच्या नेत्यांनी धिर न धरता
त्वरित हालचाली करून त्यांचि खासदारकी रद्द केली. राहुल गांधी यांची खासदारकी रद्द करून भाजपाच्या विरोधात आवाज उठविणाऱ्यामध्ये दहशत निर्माण करण्याचा भाजपाचा प्रयत्न आहे. पण काँग्रेस कार्यकर्ते पुन्हा जोमाने भाजपाच्या हुकूमशाहीच्या विरोधात आवाज उठवतील, व यात देशातील जनता ही सहभागी आहे असे मत येथील युवकांनी व्यक्त केले. यावेळी युवक काँग्रेसचे अध्यक्ष अजिंक्य मासाळ,दिवाकर इंगोले, शुभम मेहरे,बासिद खान,बापूराव रंगारी, महिला काँग्रेस अध्यक्ष रत्न्नाताई मिसळे,सागर तिमाने,गणेश झाडे,पियुष अजमिरे,किशोर अडसोड, शारिक हूसेन,राहूल खडसे, स्वप्निल ढोमने,पवन कसोटे, अभिलेश भोयर,शोएब खान, रामकिशोर इंगळे व अन्य काॅग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.