नेर : (तालुका प्रतिनिधी रजा शेख) हा देश तरुणांचा देश म्हणून ओळखला जातो.विकासाच्या हिमशिखरावर देशाला नेण्यासाठी सळसळत्या रक्ताची राष्ट्रीय प्रेम नसा नसात असणाऱ्या तरुणांची गरज आहे.देशाला बलशाली करण्याचे दिव्य केवळ या देशातील तरुनातच आहे असे प्रतिपादन ज्येष्ठ पत्रकार तथा अष्टविनायक बँकेचे अध्यक्ष गणेश राऊत यांनी धनज येथे नेहरू महाविद्यालया द्वारा आयोजित राष्ट्रीय सेवा योजनेच्या शिबिरात केले.
या सत्राच्या अध्यक्ष स्थानी प्राध्यापक एस. यू .अर्जुने , प्रमुख मार्गदर्शक म्हणून विचारवंत संजय येवतकर, डॉ. प्रा.महेश गोमासे,रवींद्र बोबडे सर हे होते.
राष्ट्र निर्मितीत तरुणांची भूमिका या विषयावर पुढे मार्गदर्शन करताना गणेश राऊत म्हणाले राष्ट्रीय सेवा योजनेतून विद्यार्थी घडतं असतो.विद्यार्थ्यांनी सकारात्मक दृष्टीकोण ठेवून आपल्या ध्येय्या कडे वाटचाल करावी.जगभरातील सर्व थोर ,विद्वान,महापुरुष हे गरीब व सामान्य कुटुंबातून आले आहेत.विद्यार्थ्यांनी थोर महापुरुषांचे जीवनपट वाचून अंगीकार केल्यास या देशाचे भविष्य निश्चितच उज्वल होईल.जिद्द ,चिकाटी,संयम व सातत्य तुम्हाला यशो शिखरावर नेईल .बलशाली राष्ट्रा साठी तरुणांची भूमिका महत्वाची आहे.या वेळी यवतमाळ येथून आलेले प्रमुख मार्गदर्शक संजय येवतकर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले.