जिल्हा प्रतिनिधी रजा शेख
नेर येथील किलबिल विद्यानिकेतन नेर या शाळेमध्ये दिनांक ११ मार्च २०२३ बक्षीस वितरणाचा कार्यक्रम आयोजित केला असून या कार्यक्रमाला प्रेरणा शिक्षण संस्थेचा अध्यक्ष मा. डॉ.राजेंद्र चोपडे सर , सहसचिव मा. प्रा. एन.यु. धांदे सर व प्रेरणा शिक्षण संस्थेचे संचालिका तथा इंग्लिश हायस्कूल चिचगाव शाळेची मुख्याध्यापिका मा. ज्योती चोपडे मॅडम प्रमुख अतिथी अष्टविनायक बँकेचे अध्यक्ष गणेश राऊत, नवनाथ दरोई पत्रकार तसेच प्रेरणा शिक्षण संस्थेचे सचिव मोरे सर शाळेच्या मुख्याध्यापिका बांडे मॅडम, गिरोडकर मॅडम यांच्या प्रमुख उपस्थितीत क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन व हार अर्पण करून कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सहाय्यक शिक्षिका चंदा मिसळे मॅडम यांनी केले मा. गणेश राऊत यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन केले. खालील स्पर्धेचे वितरण मा. डॉ. राजेंद्र चोपडे यांच्यासह उपस्थित प्रमुख उपस्थितांच्या हस्ते करण्यात आले.
तीन पायाची शर्यत प्रथम क्रमांक कपिल वानखडे वर्ग पाचवा तर द्वितीय क्रमांक ऋषभ पारधी वर्ग पाचवा ,धावण्याची स्पर्धा प्रथम क्रमांक निधी जाधव वर्ग पहिला, द्वितीय क्रमांक तिलक सोनवणे वर्ग पहिला, संगीत खुर्ची प्रथम क्रमांक दैवत खंडारे वर्ग दुसरा द्वितीय क्रमांक अदिती उसरे वर्ग दुसरा, पोटॅटो रेस प्रथम क्रमांक सोहम राऊत वर्ग पहिला तर द्वितीय क्रमांक सुर्वी लोखंडे वर्ग पहिला, लिंबू चमचा प्रथम क्रमांक वंश पगारे वर्ग तिसरा तर द्वितीय क्रमांक नाविन्या मेत्रे वर्ग तिसरा एक मिनिट स्पर्धा प्रथम क्रमांक रश्मी देशमुख वर्ग चौथा द्वितीय क्रमांक पंकज टेळे वर्ग चौथा राधाकृष्ण स्पर्धा आनंदवाडी शाखा प्रथम क्रमांक विहान मंदीलकर फुलबाग एक धावण्याची स्पर्धा प्रथम क्रमांक आराध्या दाहाट फुलबाग दोन फ्रॉक रेस मेन शाखा प्रथम क्रमांक श्रवण बोडखे फुलबाग तळ्यात मळ्यात स्पर्धा प्रथम क्रमांक विपलव जाधव फुल भाग 2 द्वितीय क्रमांक ओम डहाके फुल भाग तीन बांगलादेवी शाखेने सुद्धा सहभाग नोंदविला या कार्यक्रमाला उपस्थित आरती देशमुख सहशिक्षिका सुषमा टेंभरे भूमिका चिरडे मेगा उघडे सेविका संगीता ठवकर मीना कोडापे आभार प्रदर्शन प्रिया उगवेकर यांनी केले