जुनैद शैख (अरणी तालुका प्रतिनिधी) आर्णी तालुक्यातील केळझरा को. येथे संत सेवालाल महाराज लिलाचरीत्र सप्ताह दरम्यान आज दिनांक 27 फेब्रुवारी रोजी घरकुल लाभार्थी मेळावा तसेच महीला बचत गट मेळावा आयोजित करण्यात आला होता.मेळाव्याचे मार्गदर्शक म्हणून श्रीमती वैशाली रसाळ संचालक जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा यवतमाळ यांनी मार्गदर्शनात घरकुल लाभार्थ्यांना प्रधानमंत्री आवास योजना, रमाई आवास योजना ,शबरी आवास योजना,पंडित दिनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत मार्गदर्शन केले आणी गावातील सुरू असलेल्या घरकुल लाभार्थी यांना ३१ मार्च पुर्वि बांधकाम पुर्ण करण्यासाठी आवाहन केले ज्या लाभार्थ्यांनी बांधकाम सुरू केलेले होते त्यांना दुसरा हप्ता लगेच देण्यासाठी सुचना दिल्या तसेच महिला स्वयंसहायता बचत गट महिलांना गावांमध्ये लोकसंख्येनुसार 18 महिला बचत गट अपेक्षित आहे ते पूर्ण केल्यास आपणास शासनाकडून घेण्यात येणारा उमेद अंतर्गत निधी पोहोचविण्याची कबुली व आश्वासन यावेळी देण्यात आले चांगल्या व्यवसायाबाबत महिलांना संघटित होण्याबाबत आव्हान व मार्गदर्शन केले या कार्यक्रमाला उपस्थित सरपंच रमेश चव्हाण यांचेसह उपसरपंच सुनंदा राठोड, ग्रामसेवक देशभ्रतार, नितीन पुरी(बि.एम.एम)विलास राठोड(बिल.एम.सि.बि)प्रतीक जोशी , विनोद राठोड (सि.सि) संतोष जिरे बचत गट कर्मचारी व राहुल चव्हाण घरकुल विभाग प.स.तसेच ग्रा.प.सदस्य बेबि जाधव, सुनिता न्याती, सिंधू लाखे
पुष्पा आडे (एस.आर.पी) व ईतर नागरिक उपस्थित होते.
या कार्यक्रमाचे आयोजन रमेश चव्हाण सरपंच यांनी केले होते.