जुनेद शेेख आर्णी प्रतिनिधी
शालेय विद्यार्थ्यांमधे असलेल्या विविध सुप्त गुणांना चालना देण्यासाठी व त्यांच्यातील नृत्य, अभिनय कौशल्य, वक्तृत्व गुण सादर करण्यासाठी आर्णी येथील नारायणलीला इंग्लिश मीडियम स्कूल येथे वार्षिक सांस्कृतिक सोहळा आयोजित करण्यात आला होता.
या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेउन कार्यक्रमाची शोभा वाढविली होती.
विद्यार्थ्यांनतर्फे देशभक्तीपर सामजिक सांस्कृतिक शैक्षनिक नाटके आणि नृत्य सादर करण्यात आले त्यामध्ये आदिवासी, बंजारा, कोळी, राजस्थानी, गुजराती आणि कव्वाली अशा विविध लोक गीतांवर आधारीत नृत्य सादर करण्यात आले तसेच सर्वधर्म समभावावर आधारीत मानवी मनोरे (पिरॅमिड) सादर करण्यात आले.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षपद संस्थेचे अध्यक्ष श्री. प्रमोदजी बूब सर यांनी भुषविले तसेच प्रमुख पाहुणे म्हणून भारतीय जनता पक्षाचे जिल्हा अध्यक्ष श्री. नितीनजी भुतडा, जिल्हा शिक्षणाधिकारी श्री. प्रमोदजी सुर्यवंशी सर, गटशिक्षणाधिकारी श्री. किशोरजी रावते सर, श्री. ठाकूरदासजी बूब सर,.किनी गट गरमपंचायत चे सरपंच व ( तालूका अध्यक्ष अर्णी ) रवींद्र राठोड सौ. मालपानी मॅम, सौ. शोभा ठाकूरदासजी बूब, सौ. सुनीता प्रमोदजी बूब, सौ. शीतल नंदकिशोरजी राठी प्रेस क्लबचे श्री. विनोद सोयाम, श्री. नौशाद अली सैय्यद, श्री. राजेशजी माहेश्वरी, श्री. प्रशिकजी मुनेश्वर, श्री. रुपेशजी टाक व इतर पाहुणे मंडळी उपस्थीत होते. या कार्यक्रमाचे औचित्य साधुन शाळेच्या प्रथम बुलेटिन चे विमोचन पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले,तसेच श्री. नितीनजी भुतडा व श्री. प्रमोद सुर्यवंशी सर यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
प्रास्ताविक भाषण श्री. ठाकुरदासजी बूब सर यांनी सादर केले तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शाळेच्या विद्यार्थीनी चमुने केले आणि आभार प्रदर्शन सिराज भाटी सर यांनी केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेच्या मुख्याध्यापिका दीपाली ठाकरे मॅम, शाळेचे एडमिनिस्ट्रेटिव हेड फरहान खान सर, मुख्याध्यापक शालिनी झाम्बड मॅम, उपमुख्याध्यापक संतोष रुडे सर, तसेच शाळेतील सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी कठोर परिश्रम घेतले. तसेच सर्व सहभागी विद्यार्थी व पालकांचे या कार्यक्रमाला सहकार्य लाभले.