त्यागमूर्ती माता रमाई यांची जयंती उत्साहात साजरी.
By -
February 07, 2023
0
नेर :(-नेर प्रतिनिधी रजा शेख) पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे त्यागमूर्ती माता रमाई यांच्या 125 व्या जयंतीनिमित्त बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनेच्या वतीने अभिवादन करण्यात आले, या कार्यक्रमाला विचाराचा जनसागर आला असून या कार्यक्रमाला मौर्य क्रांती संघाच्या महिला प्रकोष्ट राज्य प्रदेश अध्यक्ष मा.प्रमोदिनीताई मुंदाने होत्या, प्रथम त्याग मूर्ती माता रमाई यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थित सर्व जनसमुदायाने पुष्प अर्पण करून अभिवादन केले, यावेळी माता रमाईंच्या जयघोषाने परिसर दुमदुमून गेला या कार्यक्रमाला महिलांनी चांगली उपस्थिती दर्शवली, रमाईच्या समर्पण व त्यागामुळेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर बहुजन समाजातील दुर्बल घटकांनसाठी व देशासाठी काही करू शकले याचा आदर्श व प्रेरणा बहुजन समाजातील महिलांनी घेतली पाहिजे असे प्रतिपादन प्रमोदीनीताई मुंदाने यांनी आपल्या अध्यक्षीय बोधनात्मक विचारातून व्यक्त केले, माता रमाई डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहिल्या डॉ.बाबासाहेब आंबेडकर परदेशी गेल्यावर परिवाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या माता रमाईने हालअपेष्टा सहन करून काम केलेल्या पैशातून डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना सुद्धा शिक्षणासाठी पैसे पाठवलेत अशा माता रमाईच्या कार्याचा उजाळा राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या संघमित्राताई गायकवाड यांनी दिला, याच बरोबर शालुताई बोदीले यांनी सुद्धा आपले विचार मांडले, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद पाटील यांनी केले तर प्रास्ताविक कल्पनाताई खोब्रागडे यांनी केले व आभार प्रदर्शन महादेवजी घरडे यांनी केले यावेळी कार्यक्रमाला वैशालीताई तूपटकर, प्रीती गवई, वासुदेवराव शेंडे, प्रमोद गायकवाड, अनिरुद्ध मुंदाने, डॉ.अशोक खोब्रागडे, दिनेश वांगे, मुरलीधर गायकवाड, राजीव डफाडे, सुनील गवई, अमोल घरडे सर, निखिल भगत, रजा शेख, मा.रुपेश जी इत्यादी उपस्थित होते.
Tags: