नेर ( प्रति) विद्यार्थ्यांच्या कला गुणांना मुक्त व्यासपीठ उपलब्ध करून देण्याच्या उदष्ठा ने नेर येथील इलीगंट इंग्लिश मिडीयम हायस्कूल येथे ईलीगंटशिया क्रीडा स्पर्धा २०२३ व "स्वराज्य -2023 "स्नेह-समेलन संस्क्रुतिक सोहळा नुकताच संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी नेर नगर परिषदेचे उप नगराध्यक्ष श्री.पवनभाऊ जयस्वाल हे होते तर सत्कार्मुर्ती श्री. भाऊरावजी ढवळे( संपर्क प्रमुख नेर, दारव्हा, दिग्रस)हे होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे श्री. मनोजभाऊ नाल्हे( तालुका प्रमुख, शिवसेना शिंदे गट ),श्री.भरतभाऊ मसराम( जिल्हा परिषद सदस्य), श्री.दिपकभाऊ आडे(माजी अध्यक्ष,अस्टविनायक अर्बन बँक),श्री. नितीनभाऊ माकोडे(नगर सेवक न.प.नेर), सौ. वैशालीताई मासाळ (नगर सेवक न.प.नेर तथा जिल्हा महिला प्रमुख शिवसेना शिंदे गट ),श्री. अमोलभाऊ तंबाखे ( सामाजिक कार्यकर्ते ), श्री. चव्हाण सर, श्री. इम्रान खान सर (संचालक, इलीगंट नेर ),सौ. कल्पना बिबे मॅडम (मुख्यध्यापिका इलीगंट), श्री.शफिर सर ( मुखध्यापक इलीगंट.नेर ), श्री. प्रशान्त उघडे सर( उप -मुख्याध्यापकइलीगंट नेर )हे होते. या प्रसंगी शाळेमधून शिक्षण घेणाऱ्या माजी विद्यार्थ्यां जे विद्यार्थी आज त्यांच्या त्यांच्या क्षेत्रात अतिशय मोठ्या हुध्यावर आहेत. अश्या विद्याअर्थाच्या पालकांचा शाल व श्री फळ देऊन सत्कार करण्यात आला.विद्यार्थ्यांनी आपल्या जीवनात शालेय शिक्षणापासुनच खेळ व संस्क्रुतिक प्रकारामध्ये प्रगती करायला पाहिजे असे उदगार श्री. पवनभाऊ जयस्वाल यांनी काढले.उदघाटकीय कार्यक्रमांनतर सांस्कृतिक कार्यक्रमाला सुरवात करण्यात आली. शाळेतील विद्यार्थ्यांनी एका पेक्षा एक सरस नृत्य करून प्रेक्षकांची माने जिकली या कार्यक्रमाचे सचालन श्री. बिनोद भगत सर यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री. इम्रान खान सर ( संचालक इलीगंट नेर )यांनी केले.
ईलीगंटशिया क्रीडा स्पर्धा २०२३ व "स्वराज्य -2023 "स्नेह-समेलन संस्क्रुतिक सोहळा या कार्यक्रममधून शाळेत स्थापन करण्यात आलेल्या ऑरेंज ग्रुप, व्हाईट ग्रुप, ग्रीन ग्रुप वर ब्लु गृप मधून २०२३ चा चॅम्पिईन समूहाची निवड होतं असल्याने सर्व समूहामध्ये शिस्ती पासून सादरीकरनापर्यंत चूरस पाहायला मिळाली.ईलीगंटशिया क्रीडा स्पर्धा २०२३ व "स्वराज्य -2023 "स्नेह-समेलन संस्क्रुतिक सोहळा या कार्यक्रममधून शाळेमध्ये स्थापन करण्यात आलेल्या ऑरेंज ग्रुप, व्हाईट ग्रुप, ग्रीन ग्रुप वर ब्लु गृप मधून २०२३ चा चॅम्पिईन समूहाची निवड आणि बक्षीस वितरण कार्यक्रम ३ फेब्रुवारी २०२३ रोज शुक्रवारला स्थानिक इलीगंट आय एफ इंग्लिह मिडीयम स्कूल च्या स्व. नंदकुमार माकोडे संस्क्रुतिक सभागृहात पार पडला. या कार्यक्रमाला उदघाटक म्हणून श्री. डॉ.प्रवीणजी बनसोड सर (प्राचार्य, नेहरू महाविद्यालय )हे होते तर कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री. श्रीराम चव्हाण सर (प्राध्यापक तथा क्रीडा प्रशिक्षक, नेहरू महाविद्यालय )हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री. शेख सर (प्राध्यापक इंग्रजी विभाग,नेहरू महाविद्यालय)श्री. गणेश भाऊ राऊत (अध्यक्ष अस्टविनायक अर्बन )हे होते.ईलीगंटशिया क्रीडा स्पर्धा २०२३ व "स्वराज्य -2023 "स्नेह-समेलन सांस्क्रुतिक सोहळा या कार्यक्रममधून आपल्या क्रीडा निपुणतेची चुणूक दाखविणाऱ्या ऑरेंज ग्रुप, व्हाईट ग्रुप, ग्रीन ग्रुप वर ब्लु गृप मधून २०२३ चा चॅम्पिईन समूहातील विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीशे देण्यात आली. संस्थेचे संचालक श्री. इम्रान खान सर, मुख्याध्यापीका. सौ. कल्पना बिबे मॅडम, मुख्याध्यापक श्री. शफीर सर, उप मुख्याध्यापक प्रशांत उघडे सर हे पाहुण्यांसोबत मंच्यावर विराजमान होते.
ईलीगंटशिया क्रीडा स्पर्धा २०२३ व "स्वराज्य -2023 "स्नेह-समेलन संस्क्रुतिक सोहळा या कार्यक्रममधून ऑरेंज ग्रुप वर ग्रीन गृप या समूहाला अनुक्रमे प्रथम वर द्वितीय रणरअप हा 'किताब देऊन गौरविण्यात आले. तर या वर्षीचा चॅम्पिईन ऑफ द स्कूल हा मानाचा पुरस्कार ब्लू समूहाला मिळाला. ब्लू समूहाच्या नावाची घोषणा होताच. विद्यार्थ्यांनी एकच जल्लोष केला. बक्षीस वितरण कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन नागेश पांडे सर यांनी केले.कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेतील सर्व शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांनी परिषम घेतले.