नेर तालुका प्रतिनिधी रजा शेख (विशेष प्रतिनिधी) शासकीय योजनांमार्फत जनसामान्यांचा विकास करण्यासाठी ,शासनाचे विविध' प्रशासकीय अधिकाऱ्यांचे' नेतृत्वामध्ये योजनांची माहिती, त्यांचे जनप्रबोधन व योजना अंमलबजावणी इत्यादी कार्य सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांकडून सुरू असते. परंतु ग्रामीण भागातील व सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांची माहिती पूर्णपणे उपलब्ध होत नाही. त्यामुळे त्यांना योजनेची माहिती मिळवणे व त्याचा लाभ घेण्यासाठी वारंवार संबंधित कार्यालयांमध्ये हेलपाटे घालावे लागतात. शासकीय योजनेतील उपक्रमांमध्ये निकषांतर्गत अर्ज सादर करणे, योजनेसाठी निश्चित केलेल्या अटी नियमांची पूर्तता करण्यासाठी प्रत्येक कार्यालयामध्ये चौकशी कक्ष असणे अत्यावश्यक आहे. योजनेच्या संदर्भात जनतेच्या मनात उद्भवणाऱ्या प्रश्नांना सोप्या व सुलभ भाषेत शंका निरसन करण्यासाठी सर्वच प्रशासकीय कार्यालयांमध्ये" संपर्क नंबर" असणे अत्यंत गरजेचे आहे. परंतु संबंधित सर्वच कार्यालयातील लँडलाईन नंबर फोन नंबर ९९ % टक्के बंद अवस्थेत असल्याचे निदर्शनास येते. त्यामुळे प्रवासाचे हेलपाटे ,न परवडणारा खर्च, याबाबत अनेकांना वारंवार मनस्ताप होतो. ही बाब संताप जनक व चिड आणणारीआहे. करिता, वरील बाबींचा गंभीर विचार करून याबाबत तात्काळ कारवाई करणे अत्यंत गरजेचे आहे. मा. धनंजय गायकवाड जिल्हाध्यक्ष यवतमाळ जिल्हा यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय जिल्हाधिकारी साहेब ,यवतमाळ. यांना वंचित बहुजन आघाडी नेर तालुका व नेर शहर शाखेच्या वतीने मा. शिवाजी मगर तहसीलदार साहेब ,नेर तालुका नेर यांचे मार्फत देण्यात आले आहे.
मा. जिल्हाधिकारी साहेब यांनी तालुक्यातील व शहरातील सर्वच प्रशासकीय अधिकारी वर्गांना आपल्या कार्यालयात ठळक अक्षरात " संपर्क नंबर "लावण्याची सूचना करण्याबाबतचे ग्रामीण भागातील सर्व ग्रामपंचायत, ग्रामपंचायत सचिव, मंडळ अधिकारी, तलाठी व गाव पातळीवर काम करणाऱ्या अधिकाऱ्यांशी तात्काळ संवाद होणे करिता, या सर्व कार्यालयात "कायमस्वरूपी संपर्क नंबर" अभ्यागतांसाठी ठेवण्यात यावा. अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे .याबाबत तात्काळ कारवाई न झाल्यास, नेर तालुका वंचित बहुजन आघाडी यांचे वतीने संवैधानिक पद्धतीने आंदोलन छेडणार असल्याचे सुचविण्यात आले आहे. माननीय धनंजय गायकवाड जिल्हाध्यक्ष यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली माननीय जिल्हाधिकारी साहेब यवतमाळ यांना व माननीय शिवाजी मगर साहेब तहसीलदार साहेब यांना लेखी निवेदन सादर करण्यात आले .त्यावेळी भाऊराव गायकवाड उपाध्यक्ष यवतमाळ जिल्हा, सतीश उरकुडे प्रसिद्धी प्रमुख यवतमाळ जिल्हा, हरिश तुपटकर अध्यक्ष नेर तालुका, प्रशिक धांदे अध्यक्ष युवा नेर तालुका, प्रदीप पांडे कार्याध्यक्ष नेर तालुका, नसरुल्ला खान जाबाज खान अध्यक्ष नेर शहर, जियाउल्ला खान , अविनाश बनसोड, संदीप रामचंद्र मिसळे , लक्ष्मण वानखडे, अमृत वासनिक, अंकुश हरिदास रामटेके, रजा शेख, सलीम खान, पियुष वसंतराव भोयर, रेहान खान, शेख साजिद, हाफिज खान, सचिन रामावत, रुपेश मिसळे, मनीष अरुण मेश्राम, रविभाऊ जयस्वाल, माणिक गेडाम, करीन खान, प्रवीण खोब्रागडे, प्रवीण रामटेके, वंचित बहुजन आघाडी नेर तालुक्यातील व शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.