राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या विचारात देश समृद्ध करण्याचे सामर्थ्य :- बहुजन क्रांती मोर्चा.
By -
February 23, 2023
0
रजा शेख नेर प्रतिनिधी:- जरा माणसाच्या डोक्यातील अंधश्रद्धेची व पाखंडवादाची घाण काढून टाकण्याकचे काम करणाऱ्या व स्वच्छतेचा संदेश देणाऱ्या वैराग्यमूर्ती राष्ट्रसंत संत गाडगे बाबा यांची १४७ वी जयंती पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक चौक नेर येथे भोजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनेच्या माध्यमातून उत्साहात साजरी करण्यात आली यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मनोर प्राध्यापक मनोहर देशमुख होते यावेळी माननीय अध्यक्ष यांच्या हस्ते प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थित जनसमुदायाने सुद्धा पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी राष्ट्रसंत गाडगेबाबांच्या विचारांचा जयघोष करण्यात आला. संत गाडगे बाबांनी कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या डोक्यातील अंधश्रद्धा व कर्मकांड काढण्याचं लोककल्याणकारी काम केले, मी कुणाचा गुरु नाही व माझा कोणी चेला नाही असे चमत्कार न मानणाऱ्या विज्ञानवादी विचार संत गाडगेबाबा चे होते असे मत आपल्या प्रबोधनात्मक विचारातून प्रोटॉन चे तालुका कार्याध्यक्ष मा. सुनील आडे यांनी व्यक्त केले. एकही वर्ग न शिकता शिक्षणाचे महत्त्व पटवून देणारे संत गाडगेबाबा हे चालते फिरते विद्यापीठ होते वजन माणसांचे विचार परिवर्तन करण्याची ताकद संत गाडगेबाबा यांच्या कीर्तनात्मक प्रबोधनात होती असे मत मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महिला प्रकोष्ट मा प्रमोदिनीताई मुंदाने यांनी व्यक्त केले. देवळात देव नसून पुजाऱ्याच पोट असते असे सांगणारे संत गाडगेबाबा हे विज्ञानवादी दृष्टिकोनाचे होते असे मत मा.प्रा. मनोहरराव देशमुख यांनी आपल्या अध्यक्षीय भाषणातुन व्येक्त केले, तसेच मा. नितीन पाटील साहेब, व मा. प्रफुल नेरकर यांनी सुध्दा आपले प्रबोधनात्मक विचार व्यक्त करून अभिवादन केले, यावेळी कार्यक्रमाचे संचालन सुनील गवई यांनी केले, तर प्रास्ताविक अनिरुद्ध मुंदाने यांनी केले व आभार प्रदर्शन राजू डफाडे यांनी केले यावेळी वासुदेवराव शेंडे, अरविंद पाटील, संतोष वरठी, आनंदी शिरसाट, दिनेश वांगे, निखिल भागवत, सचिन सरोदे, स्वरा गवई इत्यादी उपस्थित होते.
Tags: