छ. शिवाजी महाराजांचे विचार आचरणात आणा हेच खरे शिवरायांना वंदन :- बहुजन क्रांती मोर्चा.
By -
February 20, 2023
0
नेर प्रतिनिधी रजा शेख :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे बहुजन क्रांती मोर्चा व सर्व सहयोग संघटनेच्या वतीने कुळवाडी भूषण बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराज यांची ३९२ वी जयंती मोठ्या थाटात संपन्न झाली, या कार्यक्रमाला बहुसंख्येने बहुजन क्रांती मोर्चा व सर्व सहयोगी संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून नेहरू महाविद्यालयाचे प्राचार्य मा.प्रा.डॉ. प्रवीण बनसोड सर उपस्थित होते प्रथम छ. शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला अध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच उपस्थित सर्व जनसमुदायाने पुष्प अर्पण करून अभिवादन केले व छ. शिवरायांचा जयघोष करण्यात आला, छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचार प्रतिमेला का अभिवादन कराव यावर प्रबोधनात विचार मांडलेत, छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य निर्माण केलं स्वराज्याच रूपांतर सुराज्यात केल , त्या काळी शिवरायांनी शेतकऱ्यांसाठी शेती करामध्ये सवलत दिली होती की शेतकऱ्यांचा आर्थिक स्थर वाढुन शेतकऱ्यांचा विकास होईल अशी दूरदृष्टी शिवरायांची होती असे प्रतिपादन मा प्रा.डॉ.प्रवीण बनसोड सर यांनी केले, शिवरायांनी जे स्वराज्य निर्माण केले होते ते स्वराज्य अठरापगड जातींना एकत्रित करून केले होते आज सुद्धा शिवरायांना अपेक्षित असलेले स्वराज्य आपण शिवरायांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून सर्व महापुरुषांच्या वैचारिक वारसांना येकात्रित करण्याचे काम निरंतर करू हेच खरे शिवरायांना वंदन असेल असे प्रतिपादन मा.प्रमोदिनीताई मुंदाने ( मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र राज्य अध्यक्ष महिला प्रकोष्ट) यांनी केले, ज्या जिजाऊने दोन छत्रपती घडवले त्या जिजाऊ छ. शिवरायांच्या खऱ्या गुरु होत्या महिलांचा आदर शिवबांच्या केला जायचा असे प्रबोधनात्मक विचार राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाचे ता. अध्यक्षा मा. संघमित्राताई गायकवाड यांनी मांडले याच बरोबर मा.डॉ.अशोक खबोब्रागडे, मा. प्रज्ञाताई मोखाडे मा शालू ताई बोदीले यांनी आपले प्रब्बोधनात्मक विचार मांडले यावेळी कार्यक्रमाचे संचालन अरविंद पाटील यांनी केले प्रास्ताविक माननीय प्राध्यापक निलेश मोखाडे सर यांनी केले व आभार प्रदर्शन संतोष वरठी यांनी केले यावेळी वासुदेवराव शेंडे, सुनील गवई, अनिरुद्ध मुंदाने, प्रमोद गायकवाड, रजा शेख, राजीव डफाडे, मुरलीधर गायकवाड, किशोर सांडे, प्रवीण रंगारी, देवराव साठे, पांडुरंगजी शेंडे, सुनील वानखडे, संजयजी ढोक, दिनेशजी वांगे, प्रा. अर्जुने सर, मधुकर इंगोले, प्रेम गवई, नवनाथजी दारोई, जयराम शेमाके, अंकुश रामटेके, विश्वनाथ पांडे, अंकुश टमके, कल्पनाताई खोब्रागडे, प्रीती गवई, चंदाताई वानखडे, वैशाली तूपटकर, अर्चना ईश्वरकर,इत्यादी उपस्थित होते.
Tags: