नेर प्रतिनिधी रजा शेख :- राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा च्या माध्यमातून, चौधरी विकास पटेल (राष्ट्रीय अध्यक्ष राष्ट्रीय पिछडा वर्ग मोर्चा नई दिल्ली ) यांच्या नेतृत्वात संपूर्ण भारतामध्ये ओबीसीच्या जातनिहाय जनगणनेचा मुद्दा, खाजगीकरण, शेतकरी यांच्या मालाला यम.एस.पी, व EVM मशीन विरोधात जनजागृतीचा कार्यक्रम घेऊन राष्ट्रीय परिवर्तन यात्रा भारतभर सुरू आहे त्या अनुषंगाने यवतमाळ जिल्ह्यातील नेर या ठिकाणी माननीय विकास पटेल चौधरी यांची जाहीर सभा मोठ्या प्रमाणात संपन्न झाली , या देशात जनावरांची जनगणना केली जाते परंतु ओबीसी ची जनगणना होत नाही ही या देशात बहुसंख्य असणाऱ्या ओबीसी सोबत खुप मोठी धोकेबाजी आहे, यामुळे ओबीसी चे प्रश्न सुटत नाही त्यामुळे त्यांच्या विकासासाठी वार्षिक बजट सुध्दा दिल्या जात नाही, EVM मुळे या देशाची लोकशाही संपुष्टात आली असुन ओबिसी सोबतच देशातील नागरिकांच्या मताचे मुल्य शुन्य झाले आहे त्यामुळे या देशातील संपुर्ण नागरिकांचे समस्या कायम आहेत, यासाठी या देशातील sc,st,obc व मायनॉरिटी यांनी ऐकत्रित येऊन आपल्या हक्क अधिकाराची लढाई लढल्याशिवाय पर्याय नाही, असे प्रतीपादन मा. चौधरी विकास पटेल यांनी व्यक्त केले, यावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक येथे मा.चौधरी विकास पटेल यांचे जोरदार स्वागत करण्यात आले , व यावेळी त्यांना जनआंदोलन निधी सुद्धा देण्यात आला
आयोजक :- प्रमोदिनी ताई मुंदाने मौर्य क्रांती संघ महाराष्ट्र राज्य प्रदेशाध्यक्ष महिला प्रकोष्ट, संगमित्राताई गायकवाड राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघ , प्रीती गवई, कल्पनाताई खोब्रागडे, किशोर सांडे, ऍड. रमेश जुनघरे, राजूभाऊ धोटे, वासुदेवराव शेंडे, देवराव साठे, विनोद गोबरे, अनिरुद्ध मुंदाने, अरविंद पाटील, आनंद शिरसाठ, राजीव डफाडे, सुनील भाऊ खाडे, रुपेश मीसळे, सुनील वानखडे, नसरुल्ला खान, रजा शेख, चोखाद्रे साहेब,मनोज झोपाटे, सुरेंद्र चाहांदे, बळवंत खडसे, रोशन दहीवले , हिम्मत ढोले, प्रफुल नेरकर, सुखलालजी देशपांडे, कार्यक्रमाचे संचालन उमेश इंगोले आभार प्रदर्शन विशाल गोंडाने, व कार्यक्रमाला भारत मुक्ती मोर्चा मौर्य क्रांती संघ राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा मराठा सेवा संघ सकल कुणबी संघटना अखिल भारतीय माळी महासंघ या सर्व संघटनांचे पदाधिकारी व प्रामुख्याने मोठ्या प्रमाणात नागरिक उपस्थित होते.