नेर तालुका प्रतिनिधी रजा शेख
नेर :-पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर चौक नेर येथे राष्ट्रसंत सेवालाल महाराज यांची 284 वी जयंती बहुजन क्रांती मोर्चा व सहयोगी संघटनेच्या वतीने साजरी करण्यात आली, यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी मा.प्रा.मनोहरराव देशमुख हे होते अध्यक्षांच्या हस्ते राष्ट्रसंत सेवालाल महाराजांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला तसेच उपस्थितांनी सुद्धा पुष्प अर्पण करून अभिवादन केले, संत सेवालाल महाराजांचे विचार हे समतेचे पुरस्कर्ते होते, जांणजो छाणजो पछच मांणजो अर्थात जाणून घ्या विचारमंथन करा व नंतरच ते स्वीकार असे विज्ञानवादी विचार राष्ट्रसंत संत सेवालाल महाराज यांचे होते असे मत आपल्या अध्यक्षीय भाषणात मा. प्रा.मनोहराराव देशमुख यांनी व्यक्त केले, मुई मुंट्टी सरजित करियु, बांमळ दडीया दडिया दबायु, राजधानीप झेंडा फडकायु , गोरून केसुला नायी मोरायु. सत्य समजणे जरुरी आहे सत्य समजतात आम्हाला गुलाब बनवणाऱ्याना या देशातून पीटाळून लाऊ तेव्हाच आपण आपला झेंडा भारताच्या राजधानीवर फडकवू व तेव्हाच आपला बहुजन बंजारा समाज विकास करून दाखवेल असे महान विचार राष्ट्रसंत सेवालाल महाराजांचे होते व त्यांचे हे विचार घरोघरी पोहोचावे व या देशातल्या शिक्षण क्षेत्रामध्ये सुध्दा सेवालाल महाराजांचे साहित्य अभ्यासाला असावे असे प्रतिपादन राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाचे तालुका अध्यक्ष मा.संघमित्राताई गायकवाड यांनी केले, कार्यक्रमाचे संचालन अरविंद पाटील यांनी केले तर प्रास्ताविक अनिरुद्ध मुंदाने यांनी केले व आभार प्रदर्शन प्रमोद गायकवाड यांनी केले यावेळी वासुदेवराव शेंडे, प्रफुल नेरकर, अरविंद कुळमेथे सर, किशोर सांडे, शंकरराव मडावी, मुरलीधर गायकवाड , दिनेश वांगे, चांदाताई वानखडे, प्रीती गवई इत्यादी उपस्थित होते