नेर तालुका प्रतिनिधी रजा शेख
नेर :- गरीब परिस्थितीवर मात करत मा. लोकेश मालखेडे यांनी एल. एल.बी परिक्षेत विद्यापीठातून १० वा मेरिट तर विधी महाविद्यालयातून पहिला मेरिट म्हणून नावलौकिक मिळविले , त्यांनी बिकट परिस्थितीत मिळवलेल्या यशाचे कौतुक ,अभिनंदन व पुढील वाटचालीस शुभेच्छा सुद्धा बहुजन क्रांती मोर्चा च्या वतीने देण्यात आल्या, यावेळी मा.लोकेश मालखेडे यांनी आपल्या यशाचे श्रेय स्वतः केलेले परिश्रम, आई वडील, प्राचार्य , विधी महाविद्यालयाचे प्राध्यापक यांना दिले, भविष्यात सामाजिक न्यायासाठी संविधानाच्या मूल्यतत्वाला धरून कार्य करण्याचा मानस असल्याचे त्यांनी सांगितले, यावेळी वासुदेवराव शेंडे, मनोहरराव देशमुख, सुनील गवई, अरविंद पाटील, अनिरुद्ध मुंदाने, डॉ.अशोक खोब्रागडे, रजा शेख,उमेश इंगोले, दिनेश वांगे, अंकित सोनकुसरे, नाझिम मिर्झा, समिर मिस्त्री, इत्यादी उपस्थित होते.