नेर तालुका प्रतिनिधी रजा शेख
शिक्षणाची जननी स्त्रियांना गुलामीतून मुक्त करण्यात आली क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची १९२ वी जयंती उत्सव पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर चौक येथे करण्यात आला, कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी राष्ट्रीय मूलनिवासी महिला संघाच्या संघमित्रा ताई गायकवाड ह्या होत्या सर्वप्रथम क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेला अध्यक्षांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला व उपस्थित सर्व जनसमुदायांनी पुष्प अर्पण करून अभिवादन केले यावेळी सावित्रीबाई फुले यांचा जयघोष करण्यात आला व जयघोषाने परिसर दुमदुमून गेला,ज्या सावित्रीबाई ने ब्राह्मणी व्यवस्थेच्या विरोधात जाऊन बहुजनांच्या मुलांसाठी शिक्षणाची दारे उघडे केली व त्यांच्या साथीला क्रांतीसुर्य ज्योतिबा फुले हे उभे होते, शिक्षे विना मती गेली, मती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्त विना शूद्र खचले, एवधे अनर्थ एका अविद्येने केले, ज्योतिरावांचे वाक्य सावित्रीबाई जाणून त्यांनी पहिली मुलींची शाळा भिडे वाड्यात सुरू केली, यावेळी संघमित्राताई गायकवाड उमेश इंगोले प्रफुल नेरकर यांनी आपले प्रबोधनात्मक विचार व्यक्त केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अरविंद पाटील यांनी केले कार्यक्रमाचे प्रास्ताविक अनिरुद्ध मुंदाने यांनी केले तर आभार प्रदर्शन प्रज्वल गायकवाड यांनी केले, यावेळी वासुदेवराव शेंडे, सुनील गवई, अरविंदजी कुळमेथे सर ,दिवाकर मनवर, डॉ.अशोक खोब्रागडे, रजा शेख, मनोहरराव मुंदाने, प्रकाशजी बभुतकार, दिनेश वांगे, आनंदजी शिरसाट, नामदेवराव हरडे, प्रशांत इंगोले, प्रभूचरण कोल्हे, रमेश काळे, प्रमोदिनीताई मुंदाने, प्रीती गवई इत्यादी उपस्थित होते
Nice
ReplyDelete