नेर तालुका प्रतिनिधी रजा शेख...
नेर :- कोलुरा ग्राम विविध सहकारी संस्थेने मा .प्रा. मनोहरराव देशमुख यांची नेर तालुका सहकारी खरेदी विक्री समितीवर सर्वानुमते प्रतिनिधी पाठविण्याबाबत ऐकमत मंजुरी दिली असुन त्यांची अनपोच निवड झाली आहे, या निवडीचे बहुजन क्रांती मोर्चा ने स्वागत केले असुन मा.प्रा. मनोहरराव देशमुख यांचे पुष्पुच्छ देऊन अभिनंदन केले, मनोहरराव देशमुख हे बहुजन क्रांती मोर्चा चे सहयोगी असुन त्यांनी मराठा सेवा संघाचे तालुका अध्यक्ष पद सुध्दा भुषविले आहे, तसेच ते राष्ट्रीय पिछडा वर्ग (ओबीसी) मोर्चा नेर चे तालुका संयोजक सुध्दा आहेत, तसेच ज्येष्ठ नागरिक मंडळ नेर चे अध्यक्ष आहेत, छ. शिवराय, फुले, शाहु,आंबेडकर यांच्या विचारांचे खरे वारसदार असुन त्याच्या विचारांचा प्रचार व प्रसार ते अविरत करतात अशा कर्तृत्ववान व्यक्तिमत्वाची निवड करणे म्हणजे सहकारी संस्थेचे मजबुतीकरण होय, यावेळी वासुदेवराव शेंडे, सुनील गवई, अरविंद पाटील, अनिरुद्ध मुंदाने, रजा शेख, उमेश इंगोले,दिनेश वांगे, अंकित सोनकुसरे, नाजिम मिर्झा, समीर मिस्त्री उपस्थित होते.